पो.स्टे शिवाजीनगर गुन्हे शोध पथकांची धडाकेबाज कामगीरी चोरीस गेलेले 30 तोळे सोन्याचे दागीने मुद्देमाल आरोपीकडून केला जप्त.
दिनांक. 19.11.2023 रोजी सकाळी 08.00 वाचे सुमारास यातील फिर्यादीने फिर्यादी दिली की, फिर्यादी हे वसंतनगर, नांदेड येथील राहते घराचे दरवाज्यांना कुलुपकोंडा लावुन संपुर्ण परीवारासह तिरुपती येथे देव दर्शनासाठी गेले होते. त्यांचे घराचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने कुलुप कोंडा तोडुन घरात प्रवेश करुन घरामधील लाकडी पलंगा मध्ये ठेवलेले सोन्याचे दागीने एकुण 32.5 तोळे आजच्या किंमती 16,28,000/- रु चे दागीने चोरीस गेले होते.
दिनांक 22.11.2023 रोजी चे 09.00 वा. सदर घटनेबाबत माहीती मिळताच पोस्टे शिवाजीनगर चे अधिकारी व गुन्हे शोध पथक असे घटनास्थळी जावुन पाहणी करुन आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे पाहीले असता एक ईसम दिनांक. 20.11.2023 रोजी चे मध्यरात्री 01.30 वा चे सुमारास सदर घराचे दिशेने जात असताना व घरासमोरील दरवाज्या समोर फिरताना दिसले. त्यावरुन ईतर आजुबाजुचे कॅमेरे चेक केले असता त्याच प्रकारचा पेहराव असलेला ईसम रेंजर सायकलीवर समोर हँडलला दोन पिशव्या लटकावुन जात असताना दिसला. त्यानंतर फिर्यादी हे तिरुपती येथुन नांदेड येथे घरी आल्यानंतर त्यांनी दिनांक. 24/11/2023 रोजी पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे येवुन फिर्याद दिल्यावरुन गुन्हा रजिस्टर क्र. 420/2023 कलम 454,457,380 भादंवि चा गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हा उघडकीस आणणे करीता वरिष्ठांनी आदेशीत केल्याने श्री मोहन भोसले, पोलीस निरीक्षक, पो.स्टे शिवाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी, व अंमलदार यांनी दाखल गुन्ह्याच्या घटनास्थळावर व ईतर आजुबाजुचे लोकांना विचारपुस करुन संशयीत ईसमाचे कपडे, डोक्याला बांधलेला पांढरा दुपट्टा, त्याची चालन्याची विशिष्ट पद्धत तसेच त्याने वापरलेल्या रेंजर सायकलीवरुन व केवळ ह्युमन इंटेलिजन्स च्या आधारावर सदरचा गुन्हा कशोशीने तपास करुन 12 दिवसात उघडकीस आणला. गोपनीय माहीतीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी नामे राजु बाबुराव गायकवाड वय 34 वर्ष, व्यवसाय- मजुरी, रा. मेहबुबनगर, नांदेड यास ताब्यात घेवुन सखोल चौकशी करुन गुन्ह्यातील गेला माल बाबत विचारपुस केली असता आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल करुन त्याचे ताब्यातुन गुन्ह्यातील गेला माल सोन्याचे दागीने 1) पाटल्या 5 तोळे, 2) बांगड्या 5 तोळे पैकी 2.5 तोळे, 3) तोडे 5 तोळे, 4) नेकलेस ( कानातल्या सोबत) 4 तोळे 5) मिनीगंठन 2 तोळे 6) बिनले सोन्याचे 1 तोळे, 7) गळ्यातील साखळी 2 तोळे, 8) ओम चैन 6 ग्रॅम, 9) तिन अंगठ्या 1 तोळा, 10) मंगळसुत्र 1.5 तोळे, 11) गंठन 5 तोळे, 12) कर्नफुल 4 ग्रॅम असा 32.5 तोळे पैकी 30 तोळे सोन्याचे दागीने आजच्या किंमती प्रमाणे एकुण किंमती 15,00,000 रुपये व चांदीचे घुंगराचे पैंजन 5 तोळे किंमती 3000 रुपये असा एकुण किंमती 15,03,000 रुपये चे दागीने व गुन्ह्यात वापरलेली रेंजर सायकल किं.अं 7000 रुपये असा एकुण 15,10,000 रुपये चा मुद्देमाल आरोपी कडुन जप्त केला आहे. सदर मुद्देमाल जप्त करुन उत्कृष्ट कामगीरी केली आहे.
सदरची कामगीरी मा.श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, मा.श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्री. सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्री मोहन भोसले, पोनि पोस्टे शिवाजीनगर व गुन्हे शोध पथक प्रमुख मिलींद सोनकांबळे, पोलीस उप निरीक्षक, पोहेकॉ रविशंकर बामणे, पोकों देवसिंग सिंगल, शेख अझहर, लिंबाजी राठोड, अंकुश लंगोटे, दत्ता वडजे, बाळकृष्ण मुरकुटे यांनी पार पाडली.