आई रागावत असल्याने घरातुन निघुन गेलेली मुलगी शोधण्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध पथकाचे यश
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने जिल्हयात हरवलेले महिला / बेपत्ता मुले/ मुली यांचा शोध घेण्यासाटी दिनांक 1/11/2023 ते 30/11/2023 या दरम्यान ऑपरेशन मुस्कॉन 12 ही शोध मोहिम राबविण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक, श्रीकृष्ण कोकाटे यांनी आदेश दिले असून पो.स्टे. स्तरावर देखील 01 पथक निर्माण करुन हरवलेल्या महिला व बालकांचा शोध घेण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.
माहे एप्रिल-2023 मध्ये पोलीस स्टेशन विमानतळ हदीतील एक 19 वर्षाची मुलगी आई रागावल्याने रागाच्या भरात घर सोडून निघुन गेली होती. सदर मुलगी हरवल्या बाबत पोलीस स्टेशन विमानतळ येथे मिसींग क्रमांक 22/2023 प्रमाणे दाखल करुन तीचा शोध घेतला, पण ती मिळुन येत नव्हती. जवळपास 07 महिण्याचा कालावधी होऊनही मुलीचा शोध लागत नव्हता. तेंव्हा मा. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सर यांनी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पथकास समांतर शोध घेण्याच्या सुचना दिल्या.
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी बारकाईने शोध घेण्यास सुरुवात केली. आई सोबत संपर्क करुन मुलीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तीचा मोबाईल नंबर हस्तगत करुन संपर्क केला व कायदयाची बाजु समजाऊन सांगुन विश्वास दिला. • गोपनीय माहितीच्या आधारे सदरची मुलगी ही आईने रागावल्याने रागाच्या भरात घरसोडून एकटीच राहत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर मुलीस ताब्यात घेऊन तीस संबधीत तपासीक अमलदारा मार्फत तिचा सविस्तर जबाब घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करुन तीचे इच्छेनुसार मुलीस तीचे आईचे स्वाधीन केले.
सदरची शोध मोहिम यशस्वी करण्यासाठी महिला पोलीस उप निरीक्षक प्रियंका आर, आघाव, पोलीस अमलदार अच्युत मोरे, गणेश जाधव, यशोदा केंद्रे, तसेच तपासीक अमलदार माधव नागरगोजे, यांनी परिश्रम घेतले. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, यांनी कौतुक केले आहे.