राजकारण

४४ कॉल्स करणारा AU कोण? स्वत: रिया चक्रवर्तीनं केला खुलासा, म्हणाली…

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून पुन्हा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणाचे पडसाद लोकसभेत उमटले. शिंदे गटाचे गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित करत थेट आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख सभागृहात केला.

बिहार पोलीस, मुंबई पोलीस यांच्या तपासात तफावत आहे. AU नं रिया चक्रवर्तीला ४४ कॉल्स केले होते. AU म्हणजे आदित्य ठाकरे असं बिहार पोलिसांच्या तपासात पुढे आले होते असा दावा राहुल शेवाळे यांनी केला.

राहुल शेवाळे यांच्या आरोपानंतर AU कोण असा प्रश्न चर्चेत आला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने एका मुलाखतीत सविस्तर भूमिका मांडली होती. इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवती म्हणाली होती की, माझी मैत्रिण आहे अन्यया उदास, तिचं नाव AU नावानं सेव्ह आहे. त्यांनी आदित्य उद्धव बनवलं. यावर स्पष्टीकरणही देण्यात आलंय. मीदेखील यावर स्पष्ट बोललीय, परंतु वारंवार आदित्य ठाकरे नाव समोर येत आहे. AU म्हणजे अन्यया उदास असा खुलासा रियानं २०२० मध्ये दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

त्याचसोबत मी आयुष्यात कधीही आदित्य ठाकरेंना भेटली नाही. माझं त्यांच्याशी बोलणं झाले नाही. माझ्याकडे त्यांचा नंबर नाही. मला कुणीही संरक्षण देत नाही. माझं जीवन उद्ध्वस्त झालंय. माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम झालाय. माझ्यावर जे आरोप होतायेत त्यासाठी मला संरक्षण द्यावं असं मी बोलतेय. मी आदित्य ठाकरेंना ओळखत नाही. माझं त्यांच्याशी देणंघेणं नाही असं रिया चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे. दरम्यान, माझे कुठलेही राजकीय संबंध नाही. मी फक्त टीव्हीवर पाहिलंय. मला काहीच माहिती नाही. जर या प्रकरणात काही संशयास्पद आहे तर सीबीआय या प्रकरणात तपास करतेय. त्यामुळे जे काही सत्य असेल ते समोर येईलच असं रियानं म्हटलं होते.

राहुल शेवाळे अन् आदित्य ठाकरेंमध्ये आरोप प्रत्यारोप
अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ‘एयू’चे ४४ फोन आले होते. बिहार पोलिसांच्या दाव्यानुसार, ‘एयू’ म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे हे आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे सत्य समोर यायला हवे, अशी मागणी शिंदे गटाचे खा. राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. तर यावर आदित्य ठाकरे यांनी ज्यांची इज्जत आम्ही वाचवली, तेच आता घाण आरोप करत आहेत. याबद्दल काही बोलून मला घाणीत पडायचे नाही. ‘लव्ह यू मोअर’ एवढेच मी म्हणेन, अशी प्रतिक्रिया दिली.

या प्रकरणातील तथ्य यापूर्वीच सीबीआयच्या तपासातून समोर आले आहे. पण ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, त्यांनी केलेल्या आरोपांबद्दल मी काय बोलणार? अशा व्यक्तींना आणखी किंमत देण्यात अर्थ नाही, असा उद्वेगही आदित्य यांनी व्यक्त केला. लोकसभेत शेवाळे म्हणाले की, रियाच्या मोबाइलची पडताळणी केली असता, त्यात महाराष्ट्रातील एका राजकीय नेत्याचे म्हणजेच ‘एयू’ हे नाव आले आहे हे खरे आहे काय? रियाला सुशांत सिंहच्या आधी ४४ कॉल्स एयूचे आले होते. बिहार पोलिसांनी तपास केला तेव्हा आदित्य उद्धव ठाकरे हे नाव आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असे बिहार पोलिसांचा तपास सांगतो. याउलट मुंबई पोलिसांचा तपास वेगळा आहे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button