अनधिकृत फेरी वाल्या विरोधात मोठी तपासणी मोहीम, 61 अनधिकृत फेरी वाल्यांवर कार्यवाही
दिनांक 21 आणि दिनांक 22 नोव्हेंबेर, 2023 रोजी रोजी श्री नागेंद्र प्रसाद, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड यांच्या देखरेखी खाली अनधिकृत फेरी वाल्या विरोधात मोठी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती.
यात दिनांक 21 नोव्हेंबर रोजी नांदेड विभागात धावणाऱ्या विविध रेल्वे गाड्या तपासण्यात आल्या. या तपासणी मोहिमेत श्री नागेंद्र प्रसाद, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड यांच्या सह 04 तिकीट तपासनि स्क्वॉड सहभागी झाले होते. यात 54 अनधिकृत फेरी वाल्या विरोधात कार्यवाही करण्यात आली आणि 21,050/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
दिनांक 22 नोव्हेंबर रोजी नांदेड रेल्वे स्थानकावर सचखंड एक्सप्रेस मध्ये 07 अनधिकृत फेरी वाल्या विरोधात कार्यवारी करण्यात आली आणि 21,050/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी प्रवाशांना आवाहन केले आहे कि प्रवाशांनी अनधिकृत फेरी वाल्यांकडून कोणतेही पदार्थ घेवू नयेत.