हेल्थ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला औषध व यंत्र सामुग्रीसाठी अतिरिक्त प्रशासकीय मान्यता प्रदान

खाजगी डॉक्टर्स व परिचारिका अतिरिक्त मदतीला उपलब्ध
नांदेड, दि. 8 :- डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या दैनंदिन भेटीत सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी करून तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपा यांचा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनासमवेत परस्पर समन्वय साधून दिला असून आपआपली जबाबदारी व कर्तव्य काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाने येत्या काळात काही आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्यावर यशस्वी नियोजन करता यावे यादृष्टिने औषध व यंत्रसामुग्रीसाठी अतिरिक्त प्रशासकीय मान्यता देऊन ठेवली आहे. कोणत्याही परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर असून खाजगी डॉक्टर्स व परिचारिका अतिरिक्त मदतीसाठी उपलब्ध करून दिल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून दररोज 800 ते 1 हजार या संख्येच्या मर्यादेत रुग्ण उपचार घेत आहेत. अतिगंभीर असलेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून गत 3 दिवस दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये जे अति गंभीर आजारी असेलेले रुग्ण आहे त्यांचा मृत्यू दर 0.7 टक्क्याहून कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button