क्राईम

गावठी पिस्टलसह आरोपी अटक 

 

नांदेड शहरातील गुन्हेगारी कारवाया मोडीस काढण्याच्या अनुषंगाने मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, नांदेड शहर यांनी विविध प्रकारच्या योजना अवलंबविल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांनी नांदेड शहरातील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचेविरुध्द कडक कायदेशिर कारवाया करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनांप्रमाणे श्री. अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज जमदडे, पोना / 2085 विजयकुमार नंदे, पोना / 1353 शरदचंद्र चावरे, पोकॉ/3136 रमेश सुर्यवंशी, पोकॉ/14 भाऊसाहेब राठोड, पोकॉ/2896 शेख ईम्रान शेख एजाज, पोकॉ/3088 बालाजी कदम यांनी पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करुन त्यांच्या हालचालीची माहीती घेत होते.
दरम्याण काल दिनांक 07.10.2023 रोजी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार हे बसस्थानक परीसरामध्ये गुन्हेगारांचा शोध घेत असतांना 17.10 वाजताचे सुमारास बसस्थानक ओव्हरब्रिजचे खाली अभिलेखावरील गुन्हेगार महमद नदीम महमद नाजीम, वय 24 वर्षे व्यवसाय बेरोजगार राहणार मगदूमनगर नई आबादी शिवाजीनगर नांदेड हा निदर्शनास आला. तो पोलीसांना पाहुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यास पाठलाग करुन पकडले. त्यावेळी तो घाबरलेल्या अवस्थेत दिसत असल्याने त्यांची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे कमरेला एक लोखंडी गावठी पिस्टल ( अग्नीशस्त्र ) मॅग्झीनसहीत किंमती 20,000/- रुपयाची मिळुन आली. त्यास सदर पिस्टल बाळगण्याचे कारणाबाबत विचारणा करता त्यांनी ती नांदेड शहरामध्ये विकी करण्यासाठी आणले असल्याचे सांगितले. त्यावरुन सदर इसम यांचेविरुध्द पोना / 2085 विजयकुमार नंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.न. 442 / 2023 कलम 7 / 25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि दत्तात्रय मंठाळे व पोकों गणपती केंद्रे हे करीत असून आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने विविध मुद्दयावर तपास करणेकामी आरोपीची दिनांक 09.12.2023 पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे.
अवैद्य शस्त्र बाळगल्या प्रकरणी नमुद ईसमास अटक करुन गुन्हा दाखल केल्या प्रकरणी वरीष्ठांनी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button