डॉ.बाबासाहेब भुक्तरे यांना स्वारातीम विद्यापीठचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार जाहीर
नांदेड दि.4 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे दरवर्षी देण्यात येणारे उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी, उत्कृष्ट स्वयंसेविका व उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार नुकतेच जाहीर झाले त्यामध्ये कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेड येथील लोकप्रशासन विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.बाबासाहेब भुक्तरे यांना विद्यापीठ स्तरीय नांदेड जिल्हा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये मागील तीन वर्षांमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन तज्ञ समितीच्या मार्फत आढावा घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.18 ऑक्टोबर 2023 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. प्रा.डाॅ.बाबासाहेब भुकतरे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दलत्यांचे अशोक सूर्यवंशी,सुरेश थोरात,बाबाराव सावंत, आनंदराव सावते,संजय लोकडे,संपादक मुन्नवर खान, तुकाराम भुक्तरे,भीमराव भुक्तरे,अविनाश कोलते,राहुल भुक्तरे, गजानन भुक्तरे, विजय भुक्तरे,संतोष भुक्तरे, हर्षवर्धन भुक्तरे,सुरज सरपाते, राजू वायवळे, विठ्ठल कांबळे,शंकरराव कांबळे,बालाजी भोरगे, ॲड.संदीप कांबळे,विजय कांबळे,अभिनंदन इंगोले,प्रदीप वाठोरे,संदीप वाठोरे,बळीराम गायकवाड, बबनराव पोहरे,संभाजी बिराडे,गोपीनाथ पाटील,बुद्धरत्न गोवंदे,संजय आळणे,मोईनुद्दीन अंसारी नातेवाईक व मित्रमंडळी आदींनी अभिनंदन केले आहे.