क्राईम

गावठी पिस्टल व 116 जिवंत काडतूसासह चार आरोपींना अटक स्थानिक गुन्हे शाखाची कारवाई

नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक, श्री व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था.गु.शा. चे पथकाला आदेश दिले होते.
दिनांक 02/10/2023 रोजी गुप्त बातमीदाराकडून वाघी ते नाळेश्वर जाणारे रोडवरील आर.टी.ओ. ऑफीसजवळ काही इसम गावठी पिस्टल खरेदी व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठांना देवून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली श्री व्दारकादास चिखलीकर, पो.नि. स्था.गु.शा., नांदेड, श्री रवि वाहुळे, स.पो.नि. व श्री दत्तात्रय काळे, पो.उप.नि., स्था.गु.शा., नांदेड व पोलीस अंमलदारांसह नाळेश्वर जाणाऱ्या रोडवरील आर. टी. ओ. ऑफीसजवळ गेले असता पोलीसांची चाहूल लागताच आरोपी नामे 1) कमलेश ऊर्फ आशु पाटील पि. बालाजी लिंबापुरे, वय 23 वर्ष, रा. गॅस गोडाऊनजवळ वसरणीरोड, नांदेड 2 ) बलबिरसिंघ ऊर्फ शेरा पि. प्रतापसिंघ जाधव, वय 21 वर्ष, रा. गुरु रामदास यात्री निवास, हिंगोली गेट, नांदेड 3 ) शेख शाहबाज शेख शकील, वय 23 वर्ष, रा. दुध डेअरी, रहीमपुर, नांदेड व 4) शामसिंघ ऊर्फ शाम्या पि. गेंदासिंघ मठवाले, वय 23 वर्ष, रा. गुरुव्दारा गेट नं.2, तहसिल ऑफीसच्या मागे, नांदेड यांनी पोलीसांवर हल्ला चढवला असता पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी योग्य बळाचा वापर करुन त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून बेकायदेशीरीत्या मोठया प्रमाणात खरेदी- विक्रीसाठी आणलेले 7 गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व 116 जिवंत काडतूस असा एकूण 3,03,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदर आरोपीतांनी हैद्राबाद येथे आशिष सपुरे व रबज्योतसिंघ ऊर्फ गब्या तिवाना दोघेही रा. नांदेड यांचेसह नांदेड येथे मोठया प्रमाणात गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) पुरविण्याचे कटकारस्थान रचले होते. त्यासाठी आशिष सपुरे व रबज्योतसिंघ ऊर्फ गब्या तिवाना हे दोघेही पैसे पुरवित होते.
सदरची कामगिरी मा.श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली श्री व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा, नांदेड, सपोनि श्री रवि वाहुळे, सपोनि पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, सचिन सोनवणे, गोविंद मुंडे, सपोउपनि माधव केंद्रे, पोहेकॉ /गुंडेराव करले, पोहेकॉ / बालाजी तेलंग, पोना/ दिपक पवार, पोना संजीव जिंकलवाड, पोका /बालाजी यादगीरवाड, पोकॉ विलास कदम, पोकों/तानाजी येळगे पोकों/गजानन बयनवाड पोकॉ/ देवा चव्हाण, पोकॉ/ रणधिरसिंह राजबन्सी, पोकों/ ज्वालासिंघ बावरी, चापोकॉ/हनुमान ठाकूर, चापोकॉ/ शेख कलीम, चापोकॉ/ बालाजी मुंडे व सायबर सेलचे पोहेकॉ / दिपक ओढणे व पोहेकॉ / राजू सिटीकर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button