हेल्थ

“आयुष्यमान भव” अंतर्गत ग्रामीण रुग्णालय येथे भोकर कार्यक्रम संपन्न

 

भोकर :- आज दि २३ सप्टेंबर २०२३ रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आयुष्यमान भव: कार्यक्रम केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य विभाग राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सर्व आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य वर्धनी केंद्र येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आज आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील विविध विषयाचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध करून जास्तीजास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी मा.अभिजीत राऊत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी मा.मिनल करनवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे, ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अनंत चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी भोकर डॉ. दिपक कदम, आरोग्य सहाय्यक सत्यजीत टिप्रेसवार यांनी केले आहे.
दर शनिवारी आयुष्यमान भव अंतर्गत नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. भोकर शहर व परिसरातील नागरकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवहान केले आहे.

यानंतर शिबिरामध्ये विविध तज्ञांच्या मार्फत रुग्णाची तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉ राजाराम कोळेकर, डॉ.सागर रेड्डी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर, मनोज पांचाळ, अत्रीनंदन पांचाळ, जाहेद अलि, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, संदीप, मल्हार मोरे,गिरी रावलोड, अधिपरीचारीका राजश्री ब्राह्मणे, जिजा भवरे, आरोग्य कर्मचारी नामदेव कंधारे, कनिष्ठ लिपीक प्रल्हाद होळगे, आरोग्य सेविका मुक्ता गुट्टे, संगीता पंदीलवाड, रेणुका भिसे, सुरेश डुमलवाड, आरोग्य मित्र सुधाकर गंगातिरे, डाटा ऑपरेटर माया आडे,वाहन चालक रवि वाटोरे, प्रकाश सर्जे, संदीप व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button