पुसेसावळी येथील हल्लेखोरांना फाशीची शिक्षा द्या; शेर ए अली सोशल फाउंडेशन महा.राज्य चे मराठवाडा अध्यक्ष म.अ.नाहिद अ.समी यांची मागणी.
धर्माबाद(प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी ता. खटाव येथे दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी रात्री घडलेल्या धार्मीक दंगल व मॉबलिंचिंग या घटनेचा शेर ए अली सोशल फाउंडेशन महा. राज्य यांचा वतीने निषेध व्यक्त करुन धर्माबाद तहसीलदार शंकर हांदेशवार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.पुसेसावळी घटना घडू नये यासाठी शासनाने कठोर निर्णय येथील अल्पसंख्याकांवर विशेषत: मुस्लिमांवर हल्ला केला, जमावाने घरे जाळपोळ केली,
लोकांना मारहाण केली या घटनेत निष्पाप १ मारले गेले ,काही जन जखमी झाले.घटनेस व निष्पाप मुस्लिम तरुणाची मॉबलिंचींग करुन
हत्या करणाऱ्या जबाबदार मुख्यसुत्रधारास अटक करुन निष्पाप मुस्लिम तरुणांची मॉबलिंचिंगद्वारे
हत्या करणाऱ्या हल्लेखोरांना जलदगती न्यायालयाद्वारे फाशीची शिक्षा द्यावी, मॉबलिंचिंग मध्ये मृत्यू झालेल्या तरुणांच्या परिवारास
५० लक्ष रुपयांची आर्थिक मदत तात्काळ द्यावी, गंभीर जखमींना २० लाखाची आर्थिक मदत द्यावी, तसेच ज्या दुकानांची व्यावसायिकांचे नुकसान झाले अश्या सर्वांना ५ लक्ष रुपयांची शासकीय मदत तात्काळ द्यावी.
तसेच आगामी काळात मॉब लिंचिंग सारख्या घटना घडू नये यासाठी शासनाने कठोर निर्णय घ्यावेत. महाराष्ट्रात वाढत्या मॉबलिचिंगच्या
विरोधात लोकशाहीमार्गाने शेर ए अली सोशल फाउंडेशन महा. राज्य यांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रात च्या सर्व जिल्ह्यामध्ये जन आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा देण्यात येईल, अशी मागणी शेर ए अली सोशल फाउंडेशन महा. राज्य चे मराठवाडा अध्यक्ष म. अ. नाहिद अ. समी यांनी दिले आहे. यावेळी या निवेदनाला वंचित बहुजन आघाडी चे धर्माबाद उपाध्यक्ष किरण गजभारे व रिपब्लिक सेना चे धर्माबाद तालुकाध्यक्ष दुगाने साहेबराव यांनी निवेदनावर स्वाक्षरी करून पाठिंबा दिला आहे.