जिला

हिवताप कर्मचारी नांदेड ” विकास ” सहकारी पॅनलला पाठिंबा

 

नांदेड- महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नांदेड, संचालक मंडळ निवडणूक सन २०२३-२०२८.
माजी संचालक मंडल ” विकास ” सहकारी पॅनलला विश्वास ठेवून सर्वसाधारण मतदार संघातून सर्व श्री गंगाधर गन्लेवार, हणमंतराव वडजे, गणेश ताडेवाड, भारत हाम्पले, संजय भोसले, प्रदिप गोधने, अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातून श्री वनराज कदम, अर्जुन सावंत, शशीकांत खुडे यांनी उमेदवारी माघार घेऊन पाठिंबा दिल्या बदल आज त्यांचा जिल्हा हिवताप व हत्तीरोग कार्यालय नांदेड येथे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांचा यथोचित सत्कार करून सन्मानित करण्यात आले.

 

 

नांदेड जिल्ह्य़ातील हिवताप, हत्तीरोग कर्मचारी व पतसंस्थेचे सभासद यांच्या भेटी घेऊन ” विकास ” सहकारी पॅनलच्या सर्व उमेदवार यांना निवडून देण्या बाबत पॅनल प्रमुख सुभाष कल्याणकर यांनी विनंती केली आहे.
यावेळी विकास सहकारी पॅनल प्रमुख व उमेदवार सुभाष कल्याणकर, जी.बी.(पप्पू ) नाईक, सत्यजीत टिप्रेसवार, माणिक गिते, चंद्रभान धोंडगे, मोहन पेंढारे, अशोक ढवळे, बालाजी आळणे, मनोहर खानसोळे, व्यंकट माचनवाड, विठ्ठल मोरे, संतोष माकु, गिरीश पाटील उमेदवार व कर्मचारी सभासद कैलास साळवे, राजु शेट्टे, राजकुमार इंगळे, चंद्रशेखर नातेवार, माधव कोल्हे, व्यंकटी बकाल, प्रभाकर मुंगल, बालाजी कऱ्हाळे, बालाजी केंद्रे, पांडुरंग बोरकर, शंकर दंतुलवार, बाबुराव साळवे, गजानन अल्लापूरे, शेख नवाज, आत्माराम जाधव, शेख खाज्या, भिमराव राठोड आदी उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button