आसना बायपास ते कामगार चौक नालीला सोयीनुसार वळण
नांदेड दि.११ सध्या नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे अनेक रस्ते खोदून त्यांचे मजबुतीकरण करण्यात येत आहे याच अंतर्गत आसना बायपास ते कामगार चौक याही रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे या रुंदीकरण कार्यामध्ये रस्त्याच्या बाजूने चार फूट नालीचेही नियोजन आहे पण ही नाली करत असताना अधिकारी वर्ग मनमानी प्रमाणे काही ठिकाणी नालिला नागमोडी वळण देऊन नाली पूर्ण करत आहेत यामुळे भविष्यात अशा या नागमोडी वळणाच्या नाली मधून योग्य प्रकारे पाण्याचा निचरा होईल की नाही हा एक संशोधनाचा विषय आहे आणि काही ठिकाणी झाड आणि घर यांच्या मधून नाली काढण्यात आली आहे अधिकारी वर्ग कोणाच्या दबावाला बळी पडून नियमबाह्यपद्धतीने अशी नागमोडी नाली तयार करत आहेत हे कळायला मार्ग नाही याविषयी काही सुज्ञ नागरिकांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन नागरिकांची बोळवण केली तरी संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नाली नियमानुसार सरळ कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे नाहीतर भविष्यात या नालीचा काहीही उपयोग होणार नाही.