धर्माबाद येथील तरुण,तडफदार मोहम्मद नाहिद अ. समी यांना पुणे येथे सामाजिक राज्यस्तरीय पुरस्कार.
नांदेड(प्रतिनिधी):- श्री प्रसाद फाउंडेशन संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा सामाजिक, उद्योजक, कृषी व कला क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला व पुरुषांची राज्यस्तरीय पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
या पुरस्काराचे मानकरी साप्ताहिक युवा रक्षक चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अब्दुल नाहीद मोहम्मद अब्दुल समी यांची राज्यस्तरीय पुरस्कार करिता निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार दि. १७ जून रोजी सायंकाळी पाच वाजता बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का चौक, पुणे येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री रविंद्र धंगेकर आमदार कसबा विधानसभा पुणे, श्री प्रशांत जगताप अध्यक्ष राष्ट्रवादी पुणे शहर, श्री श्रीकृष्ण सावंत व्यवसायिक मार्गदर्शन, श्री ज्ञानेश्वर कांबळे राष्ट्रीय चर्मकार अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजक सौ. सुवर्णाताई माने अध्यक्ष श्री प्रसाद फाउंडेशन पुणे, समीर वासवंड उपाध्यक्ष, पवन दुर्वे विश्वस्त, श्रीकांत भालेकर विश्वस्त, शमिम पठाण सचिव, ॲड पल्लवी प्रभुणे विश्वस्त, राहुल बेलदरे विश्वस्त यांच्या श्री प्रसाद फाउंडेशन मार्फत पुरस्कार देण्यात येत आहे.
मोहम्मद अब्दुल नाहीद अ. समी यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.