जिला
नांदेड जिल्ह्यामधील पहिली तृतीयपंथी सर्जे अमोल भगवान ही 12 पास झाली, अभिनंदन
नांदेड अनेक हाल अपेष्टा मानापमान , सहन करत आपल्या जीवनाचा गाडा कसा बसा ओढणाऱ्या तृतीयपंथीयांच्या जीवनातही आता अमुलाग्र बदल होऊ लागले आहेत. तृतीय पंथी ही आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊ लागले असून नांदेड जिल्ह्यातील पहिली तृतीयपंथी म्हणून बारावी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान अमोल सर्जे हिने मिळविला आहे. बारावीची परीक्षा तिने अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण केली आहे . तिने मिळविलेल्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आणि मित्रमंडळी कडूनही तिचे कौतुक होत आहे. कमल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमरदिप गोधने यांनीही अमोल सर्जे हिचे कौतुक केले आहे.