शहर
दोन दिवस नळा पाणी येणार नाही
नांदेड शहरातील कोटीतीर्थ पंपगृहातुन काबरानगर व डंकीन जलशुध्दीकरण केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य जल वाहिनीवर मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. सदर गळती दुरुस्तीचे काम दिनांक १७.१२.२०२२ रोजी हाती घेत असल्यामुळे पाणी पुरवठा दोन दिवस उशीराने होणार आहे.
करीता काबरानगर जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सर्व उत्तर नांदेडचा भाग (तरोडा, अशोकनगर व शिवाजीनगर झोन) तसेच दक्षिण नांदेडचा भाग (शक्तीनगर, बोंढार, हैदरबाग व ट्रेंचीग ग्राऊंड जलकुंभ व गांधी पुतळा, रेल्वे स्टेशन व खडकपुरा जलकुंभ) या सर्व जलकुंभावरुन होणारा पाणी पुरवठा दोन दिवस उशीराने होत असल्याने नागरिकांनी याची नोंद घ्यावी व पाण्याचा वापर काटकसरीने करुन नांदेड वाघाळा महापालिकेस सहकार्य करावे
(!! पाणी हेच जीवन आहे त्याचा योग्य वापर करुन पाण्याचा अपव्यय टाळावा !!)