स्पोर्ट्स

जिल्हा नेटबॉल ( सिनियर ) संघ निवड चाचणी स्पर्धाचे चे आयोजन

नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशन नांदेड यांच्या वतीने दि . 11 एप्रिल 2023 रोजी महात्मा कबीर विद्यालय सहयोग नगर , नांदेड येथे सकाळी 08:00 ते 11 : 00 वा . या वेळेत जिल्हा नेटबॉल संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे . सदरील निवड चाचणीत सिनियर गटातील पुरुष व महिला खेळाडू सहभाग नोंदवू शकतात . या निवड चाचणीत स्पर्धेत निवड झालेले खेळाडू महाराष्ट्र अॅम्याच्योर नेटबॉल असोसिएशन व सांगली जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि . 14 ते 16 एप्रिल 2023 या कालावधीत सांगली येथे आयोजित होणा – या 16 वी सिनियर राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत नांदेड जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करतील . या निवड चाचणीत स्पर्धेत सहभाग नोंदविणा – या खेळाडूंनी निवड चाचणीच्या वेळी जन्म दाखला पुरावा , आधार कार्ड व दोन फोटो सोबत आणावे . या स्पर्धा निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा अशी माहीती जिल्हा नेटबाल असोसिएशनचे सचिव कुपटीकर पी एच यांनी दिली .

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button