मराठवाडा
संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्राची राज्यसभा सदस्या डॉ फौजिया खान यांनी मान उंचावली
भारतीय संसदेत सर्वोत्कृष्ट कामगीरी पार पाडणाऱ्या लोकसभा व राज्यसभा सदस्यांना संसदरत्न पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार देतांना खासदाराचे संसदेतील कामगीरी तसेच त्यांनी मांडलेल्या महत्वपुर्ण व अभ्यासु विषयाचे आधारावरुन विचार केला जातो. विचार करुन संसदरत्न पुरस्कार काही निवडक खासदारांना दिला जातो. त्यामध्ये या वर्षी कार्यरत राज्यसभा सदस्यांपैकी तीघांना संसदरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. त्यात परभणी येथील राष्ट्रवादी पक्षाच्या राज्यसभा सदस्या डॉ फौजिया खान यांनी महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
खा. डॉ फौजिया खान यांनी राज्यसभेत शेतकरी, नोकरदार तसेच गरीब लोकांचे विषय वेगवेगळया मार्गाने मांडून शासनाचे लक्ष त्या महत्वपुर्ण विषयाकडे वेधले आहेत. त्यांच्या या सर्व कामगरीचे मुल्यमापन करुन त्यांना या वर्षीचा संसदरत्न पुरस्कार आज घोषीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे डॉ फौजिया खान यांना गेल्या वर्षीही संसदरत्न पुरस्कार मिळाला होता. त्यांनी त्यांची ही कारर्कीद राखुन ठेवली आहे.
हा पुरस्कार आज दिनांक २५.०३.२०२३ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन प्रदान केला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन केल्या जात आहे.