क्राईम

हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयावर दगडफेक करणाऱ्या अंदाजे 16 व्यक्तीवर गुन्हे दाखल

हिमायतनगर, असद मौलाना। हिमायतनगर शहरातील चौपाटी परिसरात आसलेल्या ग्रामीण रुग्णालयावर दोन गटात झालेल्या भांडणात दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी जमावातील 11 जणांच्या नावासह इतर चार ते पाच लोकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिमायतनगर शहरातील एका लग्नसोहळा शांततेत झाल्यानंतर दोन गटात कोणत्यातरी कारणावरून दि.13 मार्च रोजी दुपारी 
वाद निर्माण झाला. तो वाद शहरातील ग्रामीण रुग्णालयात पोचला त्या जमावापैकी काहींनी दुपारी 4 वाजेच्या सुमारास येथील ग्रामीण रुग्णालयावर विटासह दगड फेकत असल्याचा प्रकार हिमायतनगर ठाण्याचे पोलीस अंमलदार नंदलाल भुरालाल चौधरी हे एका गुन्ह्याच्या तपासासाठी ग्रामीण रुग्णालय गेले होते. यावेळी लखन व्यंकटी गायकवाड, गोविंद चिमन्नाजी गायकवाड, अजय मेरटकर, पिराजी बेडके, संतोष गायकवाड, सिनु भुराजी पवार, लक्ष्मण चव्हाण, दादाराव चव्हाण, दिलीप चव्हाण, अक्षय बाबूराव देवकर, शंकर चव्हाण आणि त्यांच्यासोबत इतर चार ते पाच जणांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान केले.
यावेळी पोलिसांनी त्यांना दगडफेक करण्यास मज्जाव केला असता जमावातील काहींनी पोलिसांनाच धमकी दिली. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी यांच्या तक्रारीवरुन हिमायतनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 60/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 143, 147, 148, 149 सह कलम 135, मुंबई पोलीस कायदा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अधिनियम कलम 3 आणि 7 नुसार दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक बीरप्पा भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री पाटील हे करत आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button