शहर

सांगवी बु. परिसरातील रस्ता खोदून ठेवल्याने नागरिकांना नाहक त्रास

 

नांदेड दि.9 सांगवी बु.आसना बायपास ते कामगार पुतळा भवानी चौक या दरम्यानचा रस्ता मागील दोन महिन्यापूर्वी खोदून ठेवण्यात आला आहे त्यानंतर सदरील रस्त्याचे कोणतेही काम करण्यात आले नसल्यामुळे नागरिकांना यातायात करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता हा दोन्ही बाजूने खोदून ठेवण्यात आल्यामुळे किरकोळ अपघात रोजच घडत आहेत. रस्ता खोदण्याची कार्यवाही करत असताना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊ रस्त्यावरील आपले अतिक्रमण काढून रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सहकार्य केले. सांगवी परिसरातील नागरीक विकास कामाला नेहमीच साथ देतात रस्ता रुंदीकरणाच्या कामांमध्ये सुद्धा सर्वच ठिकाणी नागरिकांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घेतले.पण प्रशासनाला काय अडचण आली त्यांनी रस्ता खोदण्याच्या पुढे कामांमध्ये कोणतीही प्रगती केली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.रस्त्याचे काम त्वरित करून नागरिकांना होणारा त्रास प्रशासनाने कमी करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button