जिला

जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदच्या वतीने आज पासून विविध कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची माहिती

 

सिने अभिनेत्री स्मिता शेवाळे; टीव्ही स्टार हिना भागवत व कदम उपस्थित राहणार

नांदेड,28- 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 1 मार्च ते 8 मार्च या कालावधीमध्ये डिजिटल: लैंगिक समानतेसाठी नवकल्पना आणि तंत्रज्ञान युनायटेड नेशनच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या थीम प्रमाणे नांदेड जिल्हा परिषद संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा ठरवल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.

आज बुधवार दिनांक 1 मार्च रोजी आरोग्य विभागाच्या वतीने महिला अधिकारी व कर्मचारी मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता नांदेड येथील ए.के. संभाजी मंगल कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने. अधिष्ठाता डॉ. पि.डी. जमदाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री स्मिता शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी मुंबई येथील विक्रांत उरणकर, आहार तज्ञ डॉ. वैदेही नवाथे, डॉ. सुजाता पाटोदेकर मार्गदर्शन करणार आहेत.

दिनांक 2 मार्च रोजी जिल्ह्यातील नवनिर्वाचित महिला सरपंच मेळावा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी दहा वाजता घेण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात आहार तज्ञ डॉ. वर्षा डोडगे, नायब तहसीलदार संजीवनी मुखडे यांचे शेती, गायरान रस्ते आणि जमिनी विषयक कायदे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रा. सत्यभामा जाधव यांचे लिंग समभाव, अँड. मीनाकुमारी बतुला यांचे महिला विषयक कायदे, पोस्ट असिस्टंट किरण डांगे यांचे पोस्टाच्या महिलांसाठी विविध योजना, महिला व आरोग्य या विषयावर डॉ. वृषाली किन्हाळकर तसेच मुंबई अधिनियम कायदे या संदर्भात विस्तार अधिकारी प्रदीप सोनटक्के मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक 3 मार्च रोजी कृषी विभागाच्या वतीने कृषी विभागातील विविध योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांचा मेळावा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 11 वाजता होईल. शेतीतज्ञ माधुरी येवनवार यांचे किचन गार्डन आणि शेती व्यवसाय याविषयार व्याख्यान आयोजित केले आहे. याप्रसंगी शेतकरी महिलांचे आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी महिलांना सनकोट, स्कार्प व वृक्षांचे वाटप करण्यात येणार आहे.

दिनांक 4 मार्च 2023 रोजी नांदेड येथील लक्ष्मी गार्डन येथे महिला शिक्षिकेसाठी मेळाला घेतला जाणार आहे. या मेळाव्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्यासह टीव्हीवरील मराठी मालिकेतल्या कलाकार
हिना भागवत व मंगेश कदम यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींचे मनोगत व्यक्त होईल. विविध शैक्षणिक साहित्यांचे प्रदर्शनही येथे भरवले जाणार आहे. तसेच शेवटी मनोरंजनासाठी संगीतमय कार्यक्रम आयोजित केला आहे.
दिनांक 5 मार्च रोजी महिला व बाल विकास विभाग अंतर्गत नांदेड पंचायत समिती येथे अंगणवाडी कार्यकर्ते व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पोषणावर बोलू काही याविषयी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच साहित्यिक तथा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे यांचे कथाकथन होईल. त्याबरोबरच महिलांसाठी मनोरंजक खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 8 मार्च रोजी वजीराबाद येथील मल्टीपर्पज हायस्कूल येथे ग्रामीण विकास यंत्रणेच्या बचत गटाचे वस्तू विक्री प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

 

सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उप पोलीस अधिकारी अश्विनी जगताप आदींची उपस्थिती राहणार आहे. विठ्ठल येतील बासरी वादक आईनोद्दीन व वेणूवृद्ध संच यांचे बासरी वादन होणार आहे. याप्रसंगी सोलापूर येथील शिवाजी पवार हे उद्योजकता विकास आणि मार्केटिंग या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या वस्तू विक्री प्रदर्शनामध्ये बांबू पासून तयार करण्यात आलेल्या वस्तू, नैसर्गिक रंग, जात्यावर भरडलेल्या डाळी, गावरान तूप, हस्त कला, मसाले आदी वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांमधून महिलांची क्षमता बांधणी, विविध विषयांचे प्रशिक्षण, डिजिटल विषयातील ई-मेल तयार करणे, फाईल पीडीएफ करणे, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आदी बाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. जागतिक महिला दिन, आजादी का अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व महिला अधिकारी-कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button