जिला

नांदेड – अर्धापूर महामार्गावरील दाभड शिवारात तिहेरी अपघात, तीन ठार ,सात जखमी

 

नांदेड : नांदेड – अर्धापूर महामार्गावरील दाभड शिवारात तीन वाहणांचा विचित्र अपघात झाला असून या भिषण अपघातात तीन ठार व सात जखमी झाले आहेत. यात एक गंभीर जखमी आहे.हा अपघात सोमवारी मध्यरात्री बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास झाला असून कारचक्काचुर झाली आहे.आपघातामुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळित झाली होती.. महामार्ग व अर्धापूर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.जखमींना नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अपघातात तीन वर्षांच्या मुलाच समावेश आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात कारचालाका विरुद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की नांदेड अर्धापूर रस्त्यावरील दाभड शिवारात तिहेरी अपघात झाला आहे.नांदेडकडुन भरधाव वेगाने कार एम एच ३७ जी ९८८९) येत होती.कारचालकाचा वाहणावरील ताबा सुटला व कार रस्ता दुभाजकावर आदळुन अर्धापूरकडुन येणाऱ्या टेम्पोवर (एम एच १३सी यु ४६४४) जोराने आदळली.याच टेम्पोवर मागुन येणारी कार एम एच २३ एक.डी ३५६७) आदळली.यात नांदेड कडुन येणाऱ्या कार मधील अमित विठ्ठलराव घुगे (वय २९ रा तरोडा नांदेड) व टेम्पो मधील रामा प्रल्हाद डोंगरे (वय ५० रा इंचगाव ता मोहोळ जिल्हा सोलापूर) हे गंभीर जख्मी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर साईनाथ रावसाहेब मुळे हे गंभीर जख्मी झाले होते.त्यांचा उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी मृत्यू झाला. तर स्वप्नील शिवाजी पाटील गंभीर जखमी झाले आहेत .

या तिहेरी आघातात पुढील प्रमाणे जखमी झाले आहेत., अभिजित शिरफुले रा नांदेड, तर दुसऱ्या कार मधील नजमा बेगम (वय ५४), सय्यद अहमद (वय ३१) ,नाहिद बेगम (वय२५), सय्यद आयान (वय १९),जैनब सय्यद (वय तीन) हे सर्व राहणार माळटेकडी नांदेड. जखमींना नांदेड येथील विविध विविध खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस चौकी वसमत फाटाचे पोलिस उपनिरीक्षक आदित्य लाकूळे, अविनाश चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक कपील आगलावे, इर्शाद बेग, संदिप चटलेवार, जसप्रीतसिंह साहु, रमाकांत शिंदे वसंत सिनगारे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हालविले.तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. या प्रकरणी दत्तात्रय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेडकडुन येणाऱ्या कारचालाका विरुद्ध गून्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपील आगलावे हे करित आहेत.

आठ दिवसांत तीन अपघात,सात जणांचा मृत्यू.

तालुक्यातील प्रमुख रस्त्यांचे काम सुरू आहेत.या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू असून एका आठवड्यात तीन अपघात झाले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे.यात भोकरफाटा ते बारड रस्त्यावरील माऊली पेट्रोल पंपाच्या समोर झालेल्या आपघातात इस्लापूर (ता किनवट) येथील दोन महिलांचा मृत्यू झाला तर चोरंभा फाटा (ता अर्धापूर येथील आपघातात तरुणाचा मृत्यू झाला.असनापुलावर झालेल्या आपघातात पोलिस जमादाराचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री झालेल्या आपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.वाहतुकीचे नियम न पाळणे, वेगावर मर्यादा न ठेवणे, योग्य सुचना फलक नसने, सुरक्षित अंतर ठेवून वाहणे न चालविने या व अन्य कारणांमुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button