नांदेड मनपा चा भोंगळ कारभार मस्जीद हताई मालकीची जागा वक्फ बोर्डाच्या नावावर
नांदेड दि.२३ महानगरपालिका नांदेडचा भोंगळ करभार JNNURM अंतरगत रस्ता क्र. २७ मध्ये हताई मस्जिद सावरीकर दवाखाना ते करबला या रस्ता रुंदीकरणात हताई मस्जिदची जागा आखिव पत्रिका क्र. १४४७६ व १४४७८ चरची जागा बाधित झाली होती त्यानुसार म.न.पा नांदेड सर्वधारण सभा रोजी दि ३०-०६-२०११ ठराव क्र. ४२ मध्ये मस्जिदे हताईला ५० ×५० जागा म.न.पा. नांदेडची मालकीची जागा केळी मार्केट इतवारा येथील कबरस्थान भितीला लागून असलेली जागा देण्यास मान्यता दिली. असे असताना म.न.पा. नांदेड कार्यालयाने भूसंपादन अधिकारी नांदेड याना पत्र पाठवून संबंधीत मस्जिद कमिटीला जागेचा मोबदला देण्यात आले का? अशी माहिती मागितली होती.
भूसंपादन अधिकारी कार्यालयकडून म.न.पा. नांदेडला मस्जिद कमिटीला मावेजा दिलेला नाही असे पत्र देण्यात आले होते. आणि जागा संपादित करताना म.न.पा ने ताबा पावतीसुध्दा मस्जिद हताई कमिटीच्या नावाने दिलेले असतांना आणि म. न. पा. चे टॅक्ससुध्दा मस्जिद कमिटी मार्फत वसूल केले जाते. आणि मस्जिद हताई ही मालमत्ता वक्फचे नावावर नसताना वैयक्तिक नावावर असून ज्यांनी मस्जिदला दिलेली आहे. असे असताना म.न.पा. नांदेड यांनी दि. १७-०२-२०२३ रोजी संबंधीत जागेचा मोबदला ५०× ५० असे असताना ४०× २५ जागा जिल्हा वक्फ अधिकारी नांदेड यांचे नावाने पत्र काढले जागा मस्जिदची असताना संपादित वक्फ अधिकारी नांदेड यांचे नावाने करत आहेत याची शहानिशा करून न्याय देण्यात यावा अशी मागणी मौलाना अब्दुल रशीद खास्मी आणि अब्दुल कबीर मोहम्मद इस्माईल व्यवस्थापन समिती मस्जिद हातई करबला रोड नांदेड यांनी केली आहे