कंधार लोहा बिलोली यांना मागे सोडत चिखली कॉप्यामध्ये वरचढ
चिखली दि.२३ येथील परीक्षा केंद्रावर द्वितीय भाषेतील परिक्षा सत्राच्या वेळेस बिनधास्तपणे कॉपी केली जात होती. कॉपीमुक्त परिक्षा राबवू असे वृत्त जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती कार्यालयामार्फत प्रसिध्द केले होते. पण माननीय खासदार साहेबांच्या चिखली गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे. पूर्व इतिहास पाहता चिखली गाव समस्त परिसरामध्ये कॉपी साठी प्रसिद्ध असल्याचे दिसून येत
आहे.
आज बारावीच्या दुसऱ्या दिवशी परीक्षा केंद्रावर चिखली गावातील शाळेवर सुरू असलेल्या कॉपी संदर्भाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. सदरील व्हिडिओमध्ये परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे बंधन दिसून येत नाही कोणीही येऊन बिनधास्तपणे परीक्षार्थींना कॉपी देऊन जात आहेत पोलीस प्रशासन तर नावाला देखील या ठिकाणी उपलब्ध नसल्याचे दिसून येते तर परीक्षा केंद्राच्या आजूबाजूला घोळक्याने लोक प्रश्नाचे उत्तरे काढण्यात मशगुल असल्याचे चित्र दिसत होते कॉप्या पोहोचवणारे ‘कॉपीदुत’ हे चेहऱ्याला कपडा बांधून परीक्षा केंद्रामध्ये कॉप्या पुरवण्याचे कार्य करत आहेत यावेळी काही शिक्षक त्यांना कॉप्या देण्यापासून रोखत असल्याचे दिसत आहे पण त्यांना न जुमानता हे कॉपीदूत बहादुरीने आपल्या उमेदवारांना कॉप्या पुरवण्याचे कार्य इमानेइतबारे करत असल्याचेच चित्र संपूर्ण परीक्षा केंद्रावर दिसून येत आहे.
या परिसरातील नेते मंडळींनी देखील याकडे लक्ष दिले पाहिजे केवळ व्यासपीठावरून आदर्शाच्या गप्पा मारून चालणार नाही तर या परिसराची कॉपी बहाद्दर ही असलेली ओळख मिटवण्यासाठी नेत्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे नाहीतर सदरील नेत्यांनी बिना परीक्षा देताच विद्यार्थ्यांना पास करण्याचा एखादा अध्यादेशच शासन स्तरावरून काढून घ्यावा म्हणजे त्यांच्या परिसरातील परीक्षार्थींना आणि त्यांच्या हितचिंतकांना कॉप्यासाठी घ्यावा लागणारा त्रास होणार नाही कंधार लोहा बिलोली हा परिसर तसा नांदेड जिल्ह्यामध्ये कॉप्यासाठीच प्रसिद्ध असल्याचे दिसून येते या ठिकाणच्या तथाकथित नेत्यांनी आता तरी धडाडीचे पावले उचलून कॉप्यांना आळा घालण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे अन्यथा येणाऱ्या काळातील पिढीही त्यांना याबद्दल जाब विचारल्याशिवाय राहणार नाही