हेल्थ

आर.आर.मालपाणी मतिमंद विद्यालयात मेंदूविकार शिबिराच्या नाव नोंदणीस प्रारंभ

नांदेड, मेंदूचे विकार असणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या मेंदूचे विकार असणाऱ्या १८ वर्षाआतील मुला-मुलीकरीता येथील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दि. २३ ते २५ मार्च या कालावधीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठीच्या नोंदणीस प्रारंभ झाला असून गरजूंनी त्वरित नोंदणी करावी असे आवाहन मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी केले आहे. 
मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे.वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दरवर्षी दोन वेळा १८ वर्षाच्या आतील मेंदुचे विकार असणाऱ्या मुला-मुलींकरीता आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येते. 

आरोग्य शिबिरासाठी प्रत्यक्ष नोंदणी करणे अशक्य असलेल्यांनी डॉ. मनीषा तिवारी (८२०८११४८३२) व डॉ. संजय रुमाले (९०६७३७७५२०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

 आरोग्य शिबीरातील रूग्णांवर मुंबईच्या प्रसिध्द बाल मस्तिष्करोग तज्ञ डॉ. अनैता हेगडेसह तब्बल ३०-३५ डॉक्टरांची टीम आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. नेहमीप्रमाणे आवश्यकतेनुसार मोफत एमआरआय, सिटी स्कॅन, 2-डी इको, ईईजी, ईसीजी, एक्सरे व पॅथॉलॉजीकल तपासण्या करण्यात येणार आहे.
आरोग्य शिबीराचे हे तेरावे वर्ष असून आता पर्यंत झालेल्या बावीस आरोग्य शिबीरात तब्बल ५ हजार पेक्षाही अधिक रूग्णांना लाभ झाला आहे. आरोग्य शिबिरात तपासणी केलेल्या रुग्णांना सहा महिन्यांची म्हणजेच आगामी आरोग्य शिबिरापर्यंतची मोफत औषधी देण्यात येते तसेच आवश्यकते नुसार रुग्णांना दररोज शाळेतील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. एम. जी. बजाज रिहॅब्लीटेशन सेंटर येथे फिजीओ थेरपीची सोय निशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या पालकांसाठी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीमार्फत चहापाणी, नाष्टा व भोजनाची मोफत व्यवस्था केली जाते.
आरोग्य शिबीर यशस्वी व्हावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी, प्रभारी उपाध्यक्ष कमल कोठारी, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, जयप्रकाश काबरा, बनारसीदास अग्रवाल आदींच्या मार्गदर्शनाखाली मूख्याध्यापक नितीन निर्मल तसेच आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व श्री रामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button