मराठवाडा

संगीत शंकर दरबार मध्ये यावर्षी बेला शेंडे, राहुल देशपांडे, पं. नयन घोष, सावनी शेंडे, पद्मश्री विजय घाटे अशा कलावंतांची मांदियाळी

नदिड भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र जलसंस्कृतीचे जनक देव शंकरराव चाण आणि कुसुमताई चाच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री शारदा मान एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित केल्या जागा संगीत दरबा महोत्सवात प्रचिन्वषीप्रमाणावरन्न कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बेला शेंडे, राहुल देशपांडे. नमन घोष, सावनी शेंडे पराविजय पाटे दिला आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहे.
मागील अठरा वर्षापासून आयोजित केल्या जाणाऱ्या या संगीत महोत्सवाचे हे एकोणिसावे वर्ष असून यावर्षी २५ फेब्रुवारी (शनिवार) रोजी ६:०० वाजता पूर्वीच्या कार्यक्रम उद्घाटन श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी कार्यकारिणी सदस्या कु. सुजया अशोकराव चव्हाण आणि या अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर नटरंग शिव बोलतोय’, ‘जोधा अकबर अशा गाजलेल्या चित्रपटांसाठी पार्श्वगायन करणाऱ्या मराठी, हिंदी आणि तमिळ आघाडीच्या पार्श्वगायिका बेला शेंडे यांचा लाइन कॉन्सर्ट हा कार्यक्रम होणार असून यामध्ये स्व लता मंगेशकर यांनी आणि बेला शह यांच्या गाजलेल्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.
२६ फेब्रुवारी (रविवार) रोजी सायंकाळी ५:३० वाजता कल्याण अपार (पुणे) यांचे शहनाई वादन होईल, ६:०० वाजता नयन घोष यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून यावेळी अमंत्री हे असणार आहेत. उद्घाटनानंतर पं. नगन घोष (मुंबई) यांचे सतारवादन होणार असून अरविंद आबाद है तबला साथ करणार आहेत. त्यानंतर सावनी शेंडे (पुणे) यांच्या शास्त्रीय गायनाने या दिवशीच्या कार्यक्रमांचा समारोप होणार आहे.
२७ फेब्रुवारी (सोमवार) रोजी सकाळी ६:०० वाजता पहिल्या सत्रात मराठी दिनानिमित्त ‘मराठी हा या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी. पी. सावतांच्या हस्ते होईल. त्यानंतर ऋषिकेश रानडे, प्राकारादे (मुंबई) आणि संच यांचा ‘पहाट शब्द मुरांनी’ हा खास कार्यक्रम होणार आहे. श्रीकांत उमरीकर (औरंगाबाद) हे कार्यक्रमाचे निवेदन करतील.
२७ तारखेला सायंकाळी ६:०० वाजता श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष अमिताताई चव्हाण यांच्या हस्ते दुसन्या सत्राचे उद्घाटन होईल त्यानंतर मानस कुमार (मुंबई) यांचे व्हायोलीन वादन ख्यातकीर्त तबलावादक पक्षी विजय घाटे व संच (पुणे) यांचा गायन, वादन आणि नृत्याचा रंगतदार आविष्कार दर्शविणारा ‘जिया हा अनोखा कार्यक्रम होईल. त्यानंतर प्रसिद्ध गायक राहल देशपांडे (पुणे) यांच्या शास्त्रीय गायनाने या संगीत महोत्सवाचा समारोप होणार आहे.
तीन दिवस होणारे सर्व कार्यक्रम यशवंत महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर उभारण्यात येणाऱ्या मुख्य मंचावर संपन्न होणार आहेत. तरी रसिकांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या या महोत्सवाचा मनमुराद आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री शारदा भवन सोसायटीचे अध्यक्ष श्री अशोकराव चव्हाण, उपाध्यक्षा सौ. अमिताताई चव्हाण, सचिव श्री डी.पी. सावंत, सहसचिव उदय निमाळकर, कोषाध्यक्ष डॉ. रावसाहेब शेंदारकर आणि अन्य सर्व पदाधिकारी तसेच संयोजन समितीतील संजय जोशी, रत्नाकर अपस्तंभ, अपर्णा नेरकर, केश नेरलकर, गिरीश देशमुख व विश्वापार देशमुख यांनी केले आहे.
 शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दरवर्षी ‘संगीत शंकर
दरबार जोवन गौरव पुरस्कार दिला जातो यावर्षीचा संगीत क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार श्रीमती
सीतामानी राममोहन राव यांना २६ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे.
कुसुम महोत्सव २०२३
स्व डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या पत्नी स्व. सौ. कुसुमताई यांच्या स्मरणा सन २०२० मा नांदेडला कुसुम महोत्सवाचा शुभारंभ झाला. नांदेड जिल्ह्यातील महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच प्रोत्साहन देण्याच्या हेतूने माजी आमदार सौ. अमितालाई अशोकराव चव्हाण यांनी या महोत्सवाची संकल्पना मांडली होती. पहिला कुसुम महोत्सव प्रचंड उत्साहात साजरा झाल्यानंतर कोरोनामुळे दोन वर्ष या महोत्सवाचे आयोजन होऊ शकले नाही. मात्र, या पुन्हा हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
यंदाचा कुसुम महोत्सव तीन दिवसीय असून, तो मार्च सुरू होईल व मार्चला त्याचा समारोप असेल. यशवंत महाविद्यालयाचे प्रांगण, नांदेड येथे आयोजित या महोत्सवात नानाविध वस्तू आणि खाद्यपदार्थाचे सुमारे 100 स्टॉल्स लागणार असून, महोत्सवाच्या तीनही दिवशी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत हे स्टॉल्स खुले असतील. या काळात नागरिक मनसोक्त खरेदीचा तसेच विविध भागातील खाद्यपदार्थाचा आनंद लुटू शकतील.
बुधवारी | मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता प्रख्यात गायिका वैशाली सामंत यांच्या गितांचा बहारदार कार्यक्रम होणार असून, गुरुवारी २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मराठमोळी हा पारंपारिक मराठी वेशभूषेचा फैशन शो आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी प्रख्यात अभिनेत्री मधुरा वेलणकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. शुक्रवारी 3 मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता ‘आदिशक्ती हा देवीच्या विविध रूपावर आधारित नृत्य-संगीत कार्यक्रम सादर केला जाईल. याच कार्यक्रमात विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहर उमटविणाऱ्या नांदेड जिल्हयातील निवडक महिलांचा नवदुर्गा सन्मानाने गौरव केला जाणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी आखलेल्या कुसुम महोत्सवात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन महोत्सवाच्या निमंत्रक माजी आमदार सौ. अमितालाई अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button