शहर

लक्ष्मीनारायण नगरमधील अंतर्गत रस्त्याचे पांडागळे दांपत्याच्या हस्ते भुमीपूजन

 

 नांदेड :- दि. 2 तरोडा (बु.) येथील लक्ष्मीनारायण नगरमधील अंतर्गत रस्त्यासांठी महापालिकेने निधी मंजूर केला असुन या नगरात निर्माण करण्यात येणाऱ्या सीमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमीपूजन जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे व त्यांच्या सुविद्य पत्नि सौ. सुषमा पांडागळे या दाम्पत्यांचे हस्ते करण्यात आले.
 लक्ष्मीनारायण नगरमीधल रस्त्यांची अनेक वर्षापासून दूरावस्था होती. यासाठी संतोष पांडागळे यांनी महानगरपालिकेकडे तत्कालीन महापौर सौ. जयश्रीताई पावडे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करुन अंतर्गत रस्त्यावरील सीमेट काँक्रीटकामाची मंजुरी मिळवून घेतली. त्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, माजी नगरसेविका सौ. कविता संतोष मुळे, माजी नगरसेवक प्रतिनिधी ॲड. धम्मा कदम, सखाराम तुप्पेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
 कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या भुमीपुजन सोहळा प्रसंगी लक्ष्मीनारायण नगरमधील ॲड. अरुण मोरे, राजकुमार आगरकर, संतोष सुर्यवंशी, प्रभाकर ठाकुर, सुधाकर येवरे, देविदास मुधळे, पिंटू लोमटे, स्वप्नील वसमतकर, रुपेश दरगड, आकाश इंगळे, आदित्य बकवाड, सौ. आगरकर, सौ. ठाकुर, सौ. साखरे, सौ. वसमतकर, सौ. येवरे, सौ. राठोड, सौ. मंजुषा शेट्टे, सौ. अनुराधा बेलकर आदिंची उपस्थिती होती. लक्ष्मीनारायण नगरमधील बहुतेक सर्व अंतर्गत रस्त्यांना आता निधी उपलब्ध झाला असुन ही कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे नगरातील रहिवांशामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button