जिला

हिमायतनगरमध्ये चालणाऱ्या बोगस पैथॉलॉजी लैबची चौकशी करा; अन्यथा आंदोलन – रामभाऊ सूर्यवंशी    

नांदेड/हिमायतनगर| शहरात गेल्या काही वर्षापासून अधिकृत परवाना नसताना पैथॉलॉजी लैब चालवीण्याचा गोरखधंदा सुरू करून रुग्णाच्या जीवाशी खेळ चालविला जात आहे. या प्रकारामुळे अनेक रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. हिमायतनगर शहरात चालणाऱ्या अश्या बोगस लैब चालकांवर कार्यवाही करावी अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन देऊन केली आहे. यास महिन्याभराचा कालावधी लोटला असताना अद्यापही आरोग्य विभागाने बोगस लॅबचालकांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्यामुळे या लॅब चालकांना आरोग्य अधिकारी पाठबळ देत आहेत का…? असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तात्काळ बोगस लॅब चालकाचे परवाने करून कार्यवाही करावी. अन्यथा रुग्णाच्या जीवाशी खेळ चालवीत रक्त तपासणीच्या नावाखाली लूट करणाऱ्या लैब चालकावर आणि  त्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यातील येईल असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना दिला आहे.

याबाबत दिलेलता तक्रारीनुसार सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहर व तालुका आजही अविकसित आणि ग्रामीण आदिवासी बहुल भाग आहे. शासन स्तवराऊन शासकीय रुग्णालयात मोफत सुविधा मिळते. मात्र त्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या रक्त तपासणीमध्ये अनियमितता दिसते आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक हे आपल्या अर्पग्याची काळजी घेण्यासाठी आणि योग्य उपचार मिळावा म्हणून शहरात थाटण्यात आलेल्या खाजगी पैथोलॉजी लैबवर रक्त तपासणी करण्यासाठी जातात. पर्णातू शहरात एक – दोन सॊडले तर थाटण्यात आलेल्या विविध पॅथाॅलाॅजी लैब ह्या अनधिकृत आहेत. कारण त्या लैबला पॅरावैद्यकीय कौन्सिलची परवानगी नसलेल्या व्यक्तीकडून चालविली जात आहेत. त्यामुळे रक्त तपासणीच्या रिपोर्टवर अधिकृत व्यक्तीऐऐवजी अन्य व्यक्तीच्या स्वाक्षरीने रिपोर्ट दिला जात आहे. या ठिकाणी घेतलेले रक्ताचा रिपोर्ट नांदेडचे अनेक डॉक्टर्स स्वीकारत नसल्याने रुग्णांना नावायने रक्ततपासणी करून आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. तर काहीजणांना या चुकीच्या रिपोर्टमुळे आपल्या आरोग्यावर होत असलेल्या चुकीच्या उपचाराचा सामना करावा लागतो आहे.

सर्व जनतेला गुणवत्तापूर्ण पैरावैद्यकीय सेवा वाजवी दारात व योग्य वेळेवर मिळावी व बोगस पैरावैद्यकीय व्यवसायी व्यक्तीवर अंकुश राहावा यासाठी महाराष्ट्र राज्यात ३१ जुलिया २०१७ पासून राष्ट्रपती भारत सरकार यांच्या मंजुरीनुसार स्वाक्षरीसहित महाराष्ट्र पैरावैद्यकीय परिषद अधिनियम २०११ लागू झाला आहे. त्यानुसार परिषदेचे नियमित कामकाज देखील सुरु असतानाही हिमायतनगर शहरातील व ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांची अव्वाच्या सव्वा दराने फीस घेऊन आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे पैरावैद्यकीय सेवेच्या नावाखाली बोगस डिग्रीधारक व लैब टेक्नीशियन मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यात अनेकांच्या लैबला परवानगी नाही तरीदेखील अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपली दुकानदारी चालवीत असल्याचे दिसते आहे. अश्या बोगस लैबचालकामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खरे पाहता पैथोलॉजी लैबचालक एमबिबीएस, एम. डि. पॅथाॅलिजी अशी शैक्षणिक पाञता धारण करणारा व्यक्ती असायला पाजिजे. अशांनाच रक्त तपासणी रिपोर्टवर सही करण्याचा अधिकार असतो.

परंतु हिमायतनगर शहरात चालणाऱ्या अनेक लैबचालकास परवाना नसताना बोगस पैथोलॉजीवाले व छोलाछाप मुन्नाभाई केवळ १० रुपये किंमत असलेली किट वापरुन तपासणी करतात. छोलाछाप आपल्या लॅबमध्ये थातुरमातुर मशनरीचा वापर करुन तपासणी करुन दर आकारतात. यामुळे बोगस किट आणी बोगस पॅथीवाल्याकडुन योग्य तो तपासणी रिपोर्ट न आल्यामुळे सदर रुग्नांवर चुकीचा ऊपचार होऊन रूग्नांची आर्थीक पिळवणुकीसह जीवही जावू शकतो. सध्या असेच बोगस लॅबचे प्रमाण वाढल्याने रूग्नांचा जिव धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे. पैशासाठी वाट्टेल ते करणारांवर शासन होणे महत्वाचे आहे व जिल्ह्यात ऊत्तम आरोग्य यंञणा कार्यान्वित व्हावी यासाठी नांदेडच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणी आरोग्य विभागाचे सबंधित अधिकारी यांनी यास गंभीरतेने घेवुन बोगस लॅबचा गोरखधंदा हाणून पाडावा. आणी रूग्नांची होत असलेली आर्थीक लुट त्वरीत थांबवावि आणी दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रामभाऊ सूर्यवंशी यांनी केली आहे.

नुसती तक्रार दिली नाहीतर याचा शेवट करून दाखवणार- रामभाऊ सूर्यवंशी
पॅरावैद्दक व्यावसायीकांवर अंकुश असणे गरजेचे आहे, यासाठी मी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक याना तक्रार देऊन सर्व जनतेला गुणवत्तापूर्ण पॅरावैद्यकीय सेवा वाजवी दरात व योग्य वेळेत मिळावी व बोगस पॅरावैद्यक व्यवसायी व्यक्तींवर अंकुश राहावा. अशी मागणी केली आहे यास महिना झाला मात्र अद्यापही कार्यवाही झाली नाही. यामुळे निर्ढावलेल्या काटेवाले नामक छोलाछाप पैथोलॉजी लैबचालक त्यांची तक्रार दिल्यामुळे माझी बदनामी करू पाहत आहेत. यांना माहित नाही कि मी केवळ तक्रार देत नाहीतर त्या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय गप्पा बसत नाही. असे तक्रारकर्ते रामभाऊ सूर्यवंशी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button