जिला
नांदेड पोलीस दलातर्फे गुरूद्वारा येथे दहशतवादी हमला बाबत मॉक ड्रिल घेण्यात आली…..
शहरामध्ये किंवा धार्मीक स्थळावर अचानकपणे उदभवणाऱ्या घटनेला नांदेड पोलीस दलातर्फे तंत्रशुध्द व सर्वशक्तीनीशी (SOP) नुसार सामना करण्यासाठी मा. पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले.
सदर मॉक ड्रिल मध्ये गुरूद्वारा गेट नंबर 3 येथील रूम नंबर 46 मध्ये कांही यांत्रेकरूना दहशतवादयांनी बंदिस्त केल्या बाबतची माहिती मिळाली. सदरची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. प्रभावी कार्यवाहीसाठी नियंत्रण कक्ष येथील जबाबदारी डॉ अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु) नांदेड यांना देण्यात आली. पोलीस अधिक्षक नांदेड मा. श्रीकृष्ण कोकाटे, यांचे नेत्रत्वाखाली मा. श्री आबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड यांनी सर्व मोहिमचे सुत्र आपल्या हातात घेवुन वेगवेगळया टिम तयार करून स्थानिक पोलीसाच्या मदतीने तात्काळ नाकाबंदी करून प्रत्यक्ष कार्यवाही मध्ये प्रशिक्षीत क्युआरटी व आरसीपी यांचे जवान व अधिकारी यांच्या मदतीने सदर दहशतवादी हमला झालेल्या ठिकाणी हजर होऊन आत मध्ये लपुन बसलेले 3 दहशतवादी यांना ताब्यात घेवुन बंदिस्त केलेले यात्रे करूना सुखरूप बाहेर काढले.
सदर ऑपरेशन मध्ये पोलीस अधिक्षक मा. श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक, मा. श्री आबीनाश कुमार, श्री चंद्रशेन देशमुख, पोलीस उप अधिक्षक नांदेड शहर श्री द्वारकादास चिखलीकर, पोनि स्थागुशा श्री जगदीश भंडरवार, पोनि पोस्टे वजिरबाद, श्री नितीन काशीकर, पोनि पोस्टे शिवाजीनगर, श्री सुधाकर आडे, पोनि पोस्टे भाग्यनगर, श्री माणिक बेद्रे, पोनि आर्थीक गुन्हे शाखा नांदेड श्री जयप्रकाश गुटटे, पोनि नियंत्रण कक्ष नांदेड सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी श्री शिवाजी लष्करे, सपोनि श्री संतोष शेकडे, दहशतवादी सेल तसेच पोउपनि श्री मारोती दासरे विट्ठल घोगरे, क्युआरटी व अंमलदार यांनी भाग घेतला. अचानक घडलेल्या घटनेमुळे स्थानिक नागरीक व यात्रेकरू कांहीकाळ गोंधळले होते. परंतु त्यांना माहिती देण्यासाठी तेथे टिम ठेवण्यात आली होती. त्यांच्या मार्फतीने मॉक ड्रिल बदल माहिती देण्यात आली.