जिलाराजकारण

20 नोव्हेंबरच्या लोकशाहीच्या एसटीमध्ये सर्वांनी स्वार व्हा, !• बसस्थानकावर सीईओ करनवालांची उद्घोषणा

• नांदेड बसस्थाानकावर #स्वीप अंतर्गत जनजागृती

 नांदेड दि. 29 ऑक्टोंबर : प्रवाशांनो इकडे लक्ष द्या, #बस स्थानकावरील फलाट क्रमांक 1 वर ई-20 लोकशाहीची गाडी लागली आहे. आपण सर्वांनी या लोकशाही गाडीमध्ये बसून प्रवास करावा. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाचा हक्क बजवावा अशी उद्घोषणा नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मीनल करनवाल यांनी नांदेड बस स्थानकावर केली. 

गाडी अमूक या गावाला जाणार असल्यााची नेहमीची सूचना ऐकण्याुची सवय असणाऱ्या प्रवाशांना आज वेगळ्या आवाजात वेगळी सूचना ऐकायला मिळाली. सूचना होती… लोकशाहीच्याय बसमध्येज बसताना मतदानाची तिकिट काढण्याूसाठी, आपल्याच पसंतीच्या उमेदवाराला 20 नोव्हेंबरला #मतदान करण्यासाठी विसरु नका ! असे आवाहन केले.
यावेळी लोकशाही जनजागृतीच्या सेल्फी पॉईंटचे उद्घाटनही मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन मतदान करण्याचे आवाहन केले. नांदेड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान जनजागृतीचे वेगवेगळे उपक्रम राबविण्या्त येत आहेत. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

आजच्या् बसस्थानकावरील उपक्रमामध्ये एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ, बसस्थानक प्रमुख यासीन खान, शंकरराव नांदेडकर, कृष्णा उमरीकर, शिक्षणाधिकारी माधव सलगर, शिक्षणाधिकारी योजना दिलीप बनसोडे, रामचंद्र पाचंगे, महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार, प्रलोभ कुलकणी, हनुमंत पोकळे, सुनील मुत्तेकपवार, अवधूत गंजेवार, माणिक भोसले, संभाजी पोकळे, सुनील दाचावार संजय भालके आदींचा समावेश होता.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button