राजकारण

विधानसभेसाठी जिल्ह्यात 9 मतदारसंघात एकूण 515 इच्छुकांचे 667 अर्ज दाखल लोकसभा पोट निवडणुकीसाठी 56 अर्ज दाखल

•मंगळवारी शेवटच्या दिवशी विधानसभेसाठी 288 इच्छुकांचे 388 अर्ज दाखल

नांदेड दि. 29 ऑक्टोबर :- नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी 27 इच्छुकांनी 34 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 41 इच्छुकांनी 56 अर्ज दाखल केले आहेत. तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 विधानसभा क्षेत्रामध्ये आतापर्यंत 6 दिवसात 515 इच्छुकांचे एकूण 667 अर्ज दाखल झाले आहेत.

नांदेड #लोकसभा पोटनिवडणूक 16-नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 27 इच्छुकांनी 34 अर्ज दाखल केले असून आत्तापर्यंत 41 इच्छुकांनी 56 अर्ज दाखल केले आहेत.

नऊ विधानसभा क्षेत्रापैकी
किनवटमध्ये आज 10 इच्छुकांनी 16 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 31 इच्छुकांनी 45 अर्ज दाखल केले.
84-हदगावमध्ये 33 इच्छुकांनी आज 48 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 66 इच्छुकांनी 88 अर्ज दाखल केले.
85-भोकरमध्ये 76 इच्छुकांनी आज 93 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 144 इच्छुकांनी 167 अर्ज दाखल केले.
86-नांदेड उत्तरमध्ये 53 इच्छुकांनी आज 65 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 81 इच्छुकांनी 97 अर्ज दाखल केले.
87-नांदेड दक्षिणमध्ये 38 इच्छुकांनी आज 50 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 56 इच्छुकांनी 73 अर्ज दाखल केले.
88-लोहामध्ये 19 इच्छुकांनी आज 31 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 35 इच्छुकांनी 54 अर्ज दाखल केले.
89-नायगावमध्ये 18 इच्छुकांनी आज 27 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 35 इच्छुकांनी 48 अर्ज दाखल केले.
90-देगलूरमध्ये 28 इच्छुकांनी आज 39 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 43 इच्छुकांनी 60 अर्ज दाखल केले.
तर 91-मुखेडमध्ये 13 इच्छुकांनी आज 19 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 24 इच्छुकांनी 35 अर्ज दाखल केले.
नांदेड जिल्ह्यातील एकूण 9 विधानसभेसाठी एकूण 288 इच्छुकांनी आज 388 अर्ज दाखल केले तर आतापर्यंत एकूण 515 इच्छुकांनी 667 अर्ज दाखल केले आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button