मराठवाडा

राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवू नका

नांदेड/प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारने अनेक उद्योगधंद्दे गुजरात राज्यामध्ये पळविले आहेत, अनेक धोरणे नागरिकांच्या विरोधात राबविल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी ग्रामीणचे नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर आणि राष्ट्रवादी युवक-शरदचंद्र पवारचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर यांच्या उपस्थितीत नांदेड शहरातील आयटीआय चौक येथे दि.8 ऑक्टोबर रोजी महायुती सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करून महाराष्ट्रातील उद्योग धंद्दे गुजरातमध्ये पळवून नेवू नका आदी स्वरूपाच्या घोषणा देण्यात आल्या.

 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शहरातील आयटीआय चौक येथे आंदोलन करण्यात आले. राज्यातील तिघाडी सरकार सर्व क्षेत्रामध्ये निष्क्रीय ठरले असून मोठ्या उद्योगपतीनाच अधिक श्रीमंत करण्याचे धोरण राबविले आहे. राज्यातील 17 मोठे प्रकल्प गुजरातला पळविले आहे. राज्यात प्रचंड बेकारी वाढली आहे, दरडोई उत्पन्न कमी झाले आहे, शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष, फसवी पिक विमा योजना, गुन्हेगारीत प्रचंड वाढ, महापुरूषांचा अपमान, महिलांवरील वाढलेले अत्याचार, माता-भगिनींचा अपमान, आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व गणवेश नाही, विद्यार्थी आत्महत्येत वाढ, देणगी देणार्‍यालाच राज्यात कामे, शाळा दत्तक योजना, शासकीय नोकर भरती नाही, प्रचंड भ्रष्टाचार आदी शासनाच्या नाकर्ते भुमिकेच्या विरोधात अनेकांनी मत व्यक्त करून निषेध व्यक्त केला.

 

यावेळी माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, प्रा. डी.बी.जांभरूनकर, राष्ट्रवादी युवकचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार, सुभाष गायकवाड, गजानन पांपटवार, महिला जिल्हाध्यक्ष प्रांजली रावणगावकर, डॉ.परशुराम वरपडे, रंगनाथ वाघ, देवराव टिप्परसे, रामचंद्र येईलवाड, अभिजीत मुळे पाटील, प्रा.अशोक पवार, जिवनराव वडजे, गजानन चव्हाण, मधुकरराव पिंपळगावकर, बाबुराव हंबर्डे, बालाजी इंगळे, उत्तमराव आलेगावकर, रविंद्र शेट्टी, उध्दवराव राजेगोरे, रामदास पाटील, विश्‍वनाथ बडुरे, वसंतराव देशमुख, सुनिल पतंगे, शिवकुमार धोंडगे, सुभाष रावणगावकर, दिगांबर गवळे, विश्‍वांभर भोसीकर, लक्ष्मण भवरे, रामदास पाटील, पंकज कांबळे, मो.सरफराज अहेमद, खदीर कुरेशी, शरणजितसिंघ, निखील नाईक, अनिकेत तौफिक कादरी, भंडारे, सद्दामभाई, वसीमभाई, खलील पटेल, अदनान शेख, सलमान बिल्डर, अरेक भाई, कामरान खान, सत्तार भाई, इस्लाम चाऊस, सिध्दार्थ जोंधळे, नागेश दवने, शिवकुमार देवकते, पुंडलीक लहारे, मिनाताई पेठवडजकर, संगिता सुर्यवंशी, इशराज पठाण, अमोलसिंघ कामठेकर, संजय वडवळे, हनुमंत जगदंबे, बालाजी कदम, भोजराज गोनारकर, दिलीप कदम, रघुनाथ वाघमारे, प्रताप कांबळे, कपिल ससाने, अदित्य कांबळे, भैया कांबळे, प्रभाकर भालेराव, लखन वाघमारे, निलेश कांबळे, विजय पाटील, कोमेश भालशंकर, अनिकेत मल्हारी, ओमकार कांबळे, ओमकार गिरी, ओमकार वाघमारे, प्रशांत पवार, रमेश गोमासकर, अक्षय रत्नारखे, सुनील वाघमारे, गणेश वडजे, अदित्य बारसकर, विशाल गिरी, सतिश वाघमारे, बालू पाटील, संघर्ष कांबळे, सुदर्शन, सुरज वाघमारे, किरण वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

गुजरात धार्जीने सरकार -डॉ.किन्हाळकर
महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंद्दे गुजरातला तिघाडी सरकारने दिले आहे. 8 लाख कोटींचे कर्ज महाराष्ट्रावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय घेतला होता परंतू कुठे आहे शिवरायांचे स्मारक असा सवाल त्यांनी व्यक्त केला. विविध योजना राबवून केवळ मत मिळविण्याचा प्रकार सुरू केला आहे. 62 लाख तरूण बेकार झालेले आहेत. मागासवर्गीयांच्या विविध योजना बंद केलेल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या पैशाची उधळपट्टी या सरकारने चालविली आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे आदी स्वरूपाची चौफेर टिका माजी मंत्री डॉ.माधवराव किनाळकर यांनी यावेळी व्यक्त केली.

4 लाख कोटींचे प्रकल्प गुजरातला -भगवानराव पाटील आलेगावकर
महाराष्ट्र राज्यातील 4 लाख कोटींचे उद्योग गुजरातमध्ये पळविले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहंकारी असल्यामुळे मराठी माणसाच्या हातून रोजगार पळवत आहेत. भाजपा सरकारने 15 लाख रूपये देण्याचे अमिष दिले होते आता लाडकी बहिणच्या नावाखाली 15 रूपयामध्ये त्यांचे आश्‍वासन त्यांनी पुर्ण केले आहे. ही योजना काही काळासाठी आहे. महाराष्ट्राचा हक्क महाराष्ट्राला राहू दिला पाहिजे राज्यातील उद्योग इतरत्र नेवून आम्हाला बेरोजगार करू नका असेही नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी व्यक्त केले.

जातीत तेढ निर्माण करण्याचे भाजपचे कारस्थान -रऊफ जमीनदार
धर्म आणि जातीच्या नावावर आपआपसात भांडणे लावणे, द्वेष निर्माण करणे असे राजकारण भाजपकडून केले जात आहे. या देशातील नागरिक भाजपच्या धोरणामुळे सुरक्षित राहिला नाही. राज्यातील उद्योगधंद्दे गुजरात राज्यात नेले जात आहे तरीही राज्यात अस्तित्वात असलेले सरकार काहीही करत नाही. जनता योग्य वेळी त्यांना धडा शिकवेल असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवारचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी व्यक्त केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button