जिला

गुलामी झिडकारण्यासाठी ज्यांनी झळा सोसल्या त्यांची जाणिव करून देण्याची गरज – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्राप्त पत्रकार संजिव कुलकर्णी व अनिल मादसवार यांचा सन्मानपत्र देऊन झाला गौरव

नांदेड | पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडयातील नव्या पिढीला मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास माहित नाही. मराठवाडयाच्या स्वातंत्र्यासाठी रजाकाराची गुलामी झिडकारण्यासाठी ज्यांनी झळा सोसल्या त्यांची जाणीव करून देण्याची गरज आहे. मराठवाडा मुक्ति संग्राम जागर उपक्रमात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. असे उपक्रम सातत्याने व्हायला हवेत, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरु मा.डॉ. मनोहर चासकर यांनी केले. ते राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश आणि स्व. बसवंतराव मुंडकर विचार मंच नांदेड यांच्या वतीने आयोजित “पत्रकार पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणून बोलत होते. यावेळी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे हे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे हे होते.

डॉ. मनोहर चासकर पुढे असेही म्हणाले की, मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामात अनेक योध्ये लढले, त्यांचा सहास त्यातील सर्वांचाच इतिहास मांडण्यात आला नाही, याबाबत महाविद्यालयानी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या साहाय्याने माहिती संकलीत करावी. त्यांचा समग्र ग्रंथ खामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रकाशित करेल. याविषयीचे पत्र आजच निर्गमीत करायात येईल. आठ दिवसात महाविद्यालयाला पत्र पोहचेल. उपेक्षित किंवा माहिती नसलेल्या हुतात्म्यांच्या विषयीची मांडणी नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल.

यावेळी डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी धर्माबाद रेल्वे स्थानकास मराठवाडा मुक्तिसंग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांचे नाव देण्यात यावे, अशी छत्रपती संभाजीनगर येथील बैठकीत मागणी केल्याचे व तसा पत्रव्यवहार पंतप्रधान आणि रेल्वे मंत्री तसेच रेल्वे प्रशासनाला केल्याचे जाहिर केले. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त प्रतिनिधीचे मनोगत जेष्ठ पत्रकार संजिव कुलकर्णी यांनी केले. स्वातंत्र्य चळवळीतील सन्मानित कुटुंबियांचे प्रतिनिधींचे मत जेष्ठ नागरिक तात्यासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोष करतांना राज्य मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी पूर्वीची पत्रकारिता, आताच्या पत्रकारितेपुढील आव्हाणे याबाबत सविस्तर मांडणी केली. पुरस्कार प्राप्त पुरस्कार पत्रकारांविषयी कौतुक करतांनाच विधायक पत्रकारितेची गरज प्रगट केली.

श्री कुलथे पुढे असेही म्हणाले की, मराठवाडा मुक्तिसंग्रामातील उपेक्षित आणि अज्ञात चळवळी योध्‌यांची माहिती संकलीत व प्रसारीत होण्याची गरज आहे. १७ सप्टेंबर२०२४ ते ०२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्य मराठी पत्रकार परिषदेने आणि स्व.बसवंतराव मुंडकर विचार मंचाने राबविलेल्या विविध उपक्रमाचे दूरगामी चांगले परिणाम होतील. प्रातिनिधीक दोन चांगल्या पत्रकारांचा सन्मान केल्यामुळे नवीन चांगली व जबाबदार पत्रकारांची पिढी तयार होईल. संपूर्ण राज्यातील पत्रकारांच्या आरोग्यासाठी व्यापक कार्यक्रम राज्य मराठी पत्रकार परिषद आयोजित करण्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले. प्रारंभी दिप प्रज्वलन करुन आणि स्वामी रामानंद तीर्थ व स्व. बसवंतराव मुंडकर यांच्याप्रतिमेला पुष्प अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील लढवय्य यांच्या कुटुंबातील तात्या देशमुख, विनोद गंगाप्रसादजी अग्रवाल आणि श्रीमती भागीरथबाई मुंडकर यांचा तर पुरस्कार प्राप्त जेष्ठ पत्रकार संजिव कुलकर्णी व ग्रामीण पत्रकार अनिल मादसवार यांचा सत्कार करण्यात आला.

कुलगुरू आणि मान्यवरांच्या हस्ते चळवळीतील उपेक्षित बाप माणूस” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाच्या संपादिका ललित बंडे यासह प्रकाशक, मुद्रक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद मुंडकर तर नेटके संचालन डॉ. शिवदास हमंद यांनी केले. या कार्यमाच्या सफलतेसाठी राजकुमार बिराला, अनिल सिरसाट, साहेबराव जाधव, आदिनी परिश्रम घेतले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button