मराठवाडा

परभणी जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटी आढाव बैठक संपन्न

परभणी दिनांक 23 जुलै रोजी परभणी जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटी आढाव बैठक काँग्रेस कमिटी शनिवार बाजार येथे संपन्न झाली. या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेशरावजी वरपूडकर साहेब हे होते तर सदर बैठकीत परभणी जिल्हा प्रभारी माजी मंत्री.अनिलजी पटेल व मा.श्री.जफर अहेमदखाँन सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांची उपस्थिती होती. तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये बाळासाहेब देशमुख सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, ॲड. मुजाहिद खान सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, ज्येष्ठ नेते इरफान उर खान साहेब , शहराध्यक्ष नदी इनामदार, रामभाऊ घाडगे,

 

माजी महापौर भगवानदादा वाघमारे, सत्तार इनामदार , महिला शहराध्यक्षा दुराणी खानम, श्रीकांत पाटील, खदीरलाला हाश्मी, मुंजाभाउ धोंडगे, बाळासाहेब फुलारी , शिंगणकर मॅडम हे होते क्रिकेट बैठकीचे प्रस्ताविक शहराध्यक्ष निधी इनामदार यांनी केले व त्या बैठकीमध्ये परभणी लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव हे प्रचंड मतांनी निवडून आल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. दुसरा ठराव परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा पैकी दोन विधानसभा च्या जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात याव्या असा ठराव घेण्यात आला. बैठकीचे अध्यक्ष सुरेश वरपुरकर यांनी बोलले की, काँग्रेस पक्षाला मजबूत करायचे असेल तर ग्राउंड लेव्हल ला जाऊन मेहनत करावी लागेल, परभणी जिल्ह्यातील प्रत्येक बुथवर काँग्रेस पक्षाचा बूथ एजंट व त्याची कार्यसमिती असली पाहिजे,

 

काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सर्व कार्यकर्ता पदाधिकारी यांनी जनसामान्यापर्यंत पोहोचवली पाहिजे असे त्यांनी म्हटले तसेच परभणी जिल्हा प्रभारी मा.आ.अनिलजी पटेल यानी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी लोकांचा संपर्क वाढविला पाहिजे व बीजेपीच्या छुप्या सविधान विरोधी अजेंडा ला हाणून पाडले पाहिजे व परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात काम केले त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे बोलले तसेच शहर प्रभारी डॉ.जफर अहेमदखाँन यांनी काँग्रेसचे फ्रंटल सेल युवक , महिला व विद्यार्थी काँग्रेस अधिक जोमाने काम करावे कारण फ्रंटल सेल हा काँग्रेसचा कणा आहे असे त्यांनी म्हटले . बाळासाहेब देशमुख,रवी सोनकांबळे, इरफान उर रहेमान खान, अतिक उर रहेमान खान सत्तार इनामदार यांनीही आपले विचार मांडले.

 

या बैठकीमध्ये परभणी जिल्ह्यातील बुथ कमिट्याचे तालुका प्रभारी निवडण्यात आले. परभणी शहरातील प्रभाग प्रमाणे पक्ष निरीक्षक नेमण्यात आले.
बैठकीचे सूत्रसंचालन बाळासाहेब फुलारी यांनी केले तर पदाधिकारी मध्ये सुरेश देसाई, गुलमीर खान विनोद कदम नागेश सोनपसारे सुनील देशमुख अमोल जाधव, खाजा भाई, सलीम तांबोळी, सुहास पंडित, पवन निकम, मिन्हाज कादरी, संतोष सावंत , दिलावर शेख, अड. जाधव सर, सत्तार पटेल, निखिल धामणगावे, शेख मतीन, सजी खान, प्रल्हाद अवचार, अब्दुल सईद, अभय देशमुख, अकबर जहागीरदार, अजगर देशमुख, कल्याण लोहट, हनुमंत डाके, जानू बी मॅडम,तसेच सर्व तालुका अध्यक्ष व सदस्य बहुसंख्येने हजर होते तर आभार अमोल जाधव यांनी मानले

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button