हेल्थ

दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव, सहायभूत साधन मोजमाप – नाव नोंदणी शिबिराचे आयोजन

 

नांदेड दि. 21, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन व एलिम्को, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा प्रशासन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी सी.एस.आर च्या माध्यमांतून मोफत कृत्रिम अवयव व साहाय्यभूत साधनांचे मोजमाप – नावनोंदणी शिबीराचे मंगळवार दि. २३ व २४ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शहराच्या मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

मोजमाप शिबिरासाठी दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, यु.डी.आय.डी कार्ड, ऑडिओग्राफ (श्रवणयंत्रासाठी), दिव्यांगत्व दिसेल असे २ फोटो असणे आवश्यक आहे. मोजमाप – नावनोंदणी शिबिरानंतर दिव्यांगाना कृत्रिम अवयव, सहायभूत साधनांचे वाटप अंदाजित एक महिन्याच्या कालावधीत वाटप शिबिरात करण्यात येणार आहे. या शिबिरात सी.एस.आर अंतर्गत मोटराइज्ड ट्रायसिकल, ट्रायसिकल, व्हीलचेअर, सी.पी चेअर, सुगम्य केन, कुबडी जोड, मोबाईल, श्रावणयंत्र, रोलेटर, वॉकिंग स्टिक आदी साहाय्यभूत साधनांचा समावेश आहे.

शासकीय योजनेअंतर्गत गत तीन वर्षात सहायभूत साधनांचा व मोटराइज्ड ट्रायसिकल साठी गत पाच वर्षात लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव व सहायभूत साधनांचे वितरण होणार आहे. जिल्ह्यातील अशा अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक नितिन निर्मल यांनी केले आहे. या शिबिराच्या अधिक माहितीसाठी आर आर मालपाणी मतिमंद विद्यालयात संपर्क (९०६७३७७५२० / ८२०८११४८३२) करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button