पोलिस अधीक्षक कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांची बैठक संपन्न
पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड यांच्या वतीने दि. २ जानेवारी २०२३ ते दि. ८ जानेवारी २०२३ या दरम्यान पोलीस रेझिंग डेच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ श्रीमती शेवडीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.हंसराज वैद्य आणि श्री अशोक तेरकर यांची उपस्थिती होती. बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि त्यांना दिली जाणारी कायदेशीर मदत याविषयी प्रास्ताविक डॉ.ज्योती कदम यांनी केले.तर प्रमुख पाहुणे डॉ.हंसराज वैद्य यांनी ज्येष्ठांना मिळणारी शासकीय मदत कशी असावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.श्री. अशोक तेरकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने दिल्या जाणा-या कायदेशीर मदतीबद्दल समाधान व्यक्त केले.
भरोसा सेलच्या सपोनि श्रीमती एस.एम.कलेटवाड यांनी ज्येष्ठांना अधिकाधिक सहकार्य करण्यास पोलिस विभाग सदैव तत्पर असेल याची ग्वाही दिली. अध्यक्षीय समारोपात श्रीमती शेवडीकर यांनी ज्येष्ठांनी आपली मिळकतविषयक आणि इतर आर्थिक व्यवहार जपून करावेत अशा सुचना दिल्या.या बैठकीत डॉ.निर्मला कोरे, भागीरथी बच्चेवार,डॉ.दिपक केशरी यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस डॉ.पुष्पा कोकीळ, श्रीमती तेरकर,सौ.चंदा हळदे,डॉ.पुरणशेट्टीवार,सौ.विष्णुपुरीकर, महेमुदा खान,जयंवत सोमवाड, प्रभाकर कुंटूरकर, इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.कत्ते यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भरोसा सेलच्या पोलिस अंमलदार लोपामुद्रा आनेराव, संगीता चौधरी, सुजाता टाकळीकर,आशा घोडके,जयश्री शिंदे,शुभांगी जाधव यांनी परिश्रम घेतले.