खडकुत येथे जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नव्याने नळ पाणीपुरवठा योजना मंजूर
नांदेड,20 जून- नांदेड तालुक्यातील खडकुत येथे जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नव्याने नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून विहीर, पाईप लाईन, वितरण व्यवस्था व प्रत्येक घरी नळ कनेक्शन पूर्ण झाली आहेत. सर्व घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
खडकुत गाव आसना नदी काठावर वसलेले छोटे गाव आहे. सततच्या पुरामुळे सदरील गावाचे 35 वर्षांपूर्वी पुनर्वसन करण्यात आले होते. मागील अनेक वर्षापासून बोरवरूनच या गावाला पाणी प्यायला मिळत होते. परंतु केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन कार्यक्रमामधून खडकू येथे नव्याने नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. विहीर, पाईपलाईन, वितरण व्यवस्था व नळ कनेक्शन पूर्ण झाल्या नंतर दिनांक 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी गावात पाणीपुरवठा सुरू केला आहे.
खडकुत येथे 205 कुटुंब आहेत. सर्व म्हणजे 205 कुटुंबांनाही नळ जोडणी देण्यात आली आहे. याशिवाय खडकुत गाव हागणदारी मुक्त अधिकही झाले आहे. मध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घन व द्रव कचरा व्यवस्थापन घटकाचा एक भाग म्हणून गाव स्वच्छतेवर सकारात्मक परिणाम करण्यासाठी आणि गुरेढोरे तसेच सेंद्रिय कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीसाठी गोबर्धन प्रकल्पही घेण्यात आला आहे.
सरपंच दादाराव गणपतराव बुक्तरे, उपसरपंच दयामंती दादाराव बुक्तरे, पोलीस पाटील भास्करराव कंकाळ तसेच गावातील महिला मंडळाच्या अध्यक्षा सिंधुताई सरपाते, पार्वतीबाई सरपाते, स्नेहा सावंत, दिपाली सरपाते या सर्वांनी 14 एप्रिल पासून कउक उन्हाळ्यात गावात भरपूर पाणीपुरवठा जल जीवन मिशनच्या योजनेतून होत आहे. त्याबद्दल त्यांनी शासनाचे तसेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, सर्व अभियंत्यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.