हेल्थ

हृदयाचे आजार असलेल्या सदृश्य बालकांची 2 D ECHO तपासणी

दि.10/06/2024 रोजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे मा. जिल्हाधिकारी नांदेड श्री अभिजीत राऊत आणि मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड मिनल करनवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर सर, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. डॉ. बालाजी शिंदे साहेब, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके सर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे सर, डॉ.विद्या झिणे मॅडम, डॉ. हनुमंत पाटील सर यांच्या नेतृत्त्वाखाली हृदयाचे आजार असलेल्या सदृश्य बालकांची 2 D ECHO तपासणी करण्यात आली. सदर तपासणी हि बालाजी रुग्णालय, मुंबई येथील लहान मुलांचे ह्रदयरोग तज्ञ डॉ. भूषण चव्हाण आणि रुग्णालयाचे व्यवस्थापक प्रतिक मिश्रा ह्या विशेषज्ञांच्या मार्फत पार पडले. यात नांदेड जिल्ह्यातील एकूण 105 बालकांची तपासणी करण्यात आली असून या पैकी 24 ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र बालकांची शस्त्रक्रिया बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे मोफत होणार आहे.

मा.वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रताप चव्हाण सर ग्रा.रू.भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आज ग्रामीण रुग्णालय भोकर येथील 4 बालके नांदेड येथे झालेल्या 2 D -Echo Camp साठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 2 बालके ही शस्त्रक्रिये पात्र ठरली असून 1 बालक हे फॉलोअप साठी सांगितले आहे आणि 1 बालक नॉर्मल आहे असे सांगण्यात आलेले आहे.
या कामी श्री अनिल कांबळे RBSK जिल्हा कार्यक्रम समन्वयक व श्री विठ्ठल तावडे DEIC व्यवस्थापक,डॉ.व्यंकटेश टाकळकर, डॉ.अविनाश गुंडाळे, डॉ.ज्योती येन्नावार,डॉ.अपर्णा जोशी ,गिरी रावलोड ,संदीप ठाकूर,स्वाती सुवर्णकार आणि वत्सला धुमाळे व ग्रा.रू.भोकर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्यामुळे व कुपोषणाचा प्रश्न गंभीर असल्यामुळे बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील ४५ आरोग्य पथकांद्वारे वर्षातून ०२ वेळा अंगणवाडीतील व ०१ वेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ० ते १८ या वयोगटातील बालाकंची 4D म्हणजे जन्मतः व्यंग (Defect), पोषणमुल्यांची कमतरता (Deficiencies), शाररीक व मानसिक विकासात्मक विलंब (Developmental Delay), आजार (Diseases) यांचे निदान व उपचार करण्यात येतात. हृदयरोग तपासणी (2D ECHO) ,नेत्र रोग, आकडी/ फेफरे यांची मोठ्याप्रमावर शिबिरे आयोजीत करून निदान व औषधोपचार करण्यात येते.

 

जिल्ह्यातील अनेक मुला-मुलीना या कार्यक्रमाचा मोफत लाभ झालेला असून त्यात अनेक जणांवर हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.जिल्ह्यातील अंगणवाडी तपासणी दरम्यान कुपोषित बालकांना निदान व औषधोपचार करून श्रेणीवर्धन करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र (NRC) स्त्री रुग्णालय श्यामनगर, नांदेड संदर्भित करण्यात येऊन त्यांच्या पालकास बुडीत मजुरीचा लाभ देण्यात येतो. तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (District early Intervention Center / DEIC) अंतर्गत ० ते ०६ वर्ष वयोगटातील ज्या बालकांना जन्म जात आजार, अवयवांच्या उणीवा आणि विकास/वाढीचा अभाव आढळलयास त्यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया/औषधोपचार करून भविष्यात त्यांना शरीराच्या गुंतागुंतीच्या आजार किंवा उणीवापासून दूर ठेवणे शक्य होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button