नवोन्मेष आणि सामर्थ्यांचे प्रतिक: वर्षा ठाकूर-घुगे -मिलिंद व्यवहारे
विकासाचा केंद्रबिुंदू मानून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी विविध कामाच्या माध्यमातून लातूर जिल्हयाला नवा आयाम दिला आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आखून दिलेल्या कामामध्ये अधिकारी आणि कर्मचारी उत्साहाने काम करतात, त्यामुळे कामकाजाला गती मिळते. लातूर जिल्ह्याच्या 40 वर्षाच्या प्रशासकीय कारभारात जिल्हाधिकारी म्हणून प्रथमच एका महिलेच्या हाती कारभार देण्यात आला आहे. कर्ता चांगला असेल तर प्रगतीचा मार्ग गतिमान होतो, हे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूरकरांना दाखवून दिले आहे. वर्षा ठाकूर-घुगे ह्या दिनांक 23 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी म्हणून लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या. त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून आपला ठसा उमटवला आहे. केवळ आठ महिन्यात अधिकारी, कर्मचारी व जनतेमध्ये त्यांनी चांगले ऋणानुबंध निर्माण केले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांच्या संपूर्ण टीमच्या विश्वासाच्या जोरावर आव्हानात्मक भूमिका पार पाडत आहेत.
शिक्षणातील विविध टप्पे ओलांडत, प्रशासकीय सेवेत यशस्वी प्रवेश करत, सक्षमपणे अधिकारीपदाची धुरा सांभाळणाऱ्या वर्षा ठाकूर मराठवाड्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी ठरल्या आहेत. ठाकूर यांचे शिक्षण भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये झाले. तिथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. प्रशासनातील कर्तव्यदक्ष आणि सक्षम महिला अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे नाव लौकिक आहे. ठाकूर यांनी बजावलेल्या बालकामगार प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून केलेल्या कामगिरीची विशेष नोंद शासन व आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेतर्फे घेतली गेली होती. नांदेड जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी म्हणून कार्य बजावतांना विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राज्यात नांदेडला बहुमान मिळवून दिला. लातूर जिल्हयातही जिल्हाधिकारी म्हणून वर्षा ठाकूर-घुगे यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. दैनिक लोकसत्ता जिल्हा निर्देशांक पॅरामीटर्समधील कृषी, आरेाग्य, शिक्षण, वाणिज्य आदी क्षेत्रातील जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल विकास निर्देशांकात लातूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला. यानिमित्त मुंबई येथे झालेल्या सोहळ्यात त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी 1 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास हा उपक्रम लातूर जिल्हयात राबवला. यामध्ये स्वच्छता व सफाई या बाबींवर लक्ष केंद्रीत केले होते. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती क्षेत्र, ग्रामीण भागातील बसस्थानके, पर्यटन स्थळे, वारसास्थळे, नदी किनारे, नाले आदी ठिकाणी अभियानांतर्गत स्वच्छता मोहिम राबवल्याने मोठया प्रमाणात स्वच्छता झाली. तसेच मुंबई-ठाणेच्या धर्तीवर नागरीकांच्या सहभागाने
ई- कचरा संकलन तसेच स्व्च्छतेसाठी हाती घेतलेला दशसुत्री प्रभावी ठरत आहे. यामध्ये मंदिराला जोडणारे रस्ते, मंदिर परिसर, किेल्ले, बारव यांना जोडणारे रस्ते आणि आजुबाजुचा पाचशे मीटरपर्यंत विशेष स्वच्छता मोहिम शहराच्या विकासाठी महत्वाचा टप्पा आहे.
संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रूपाने जिल्हयातील पहिल्या दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन करुन दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्याच्या उपक्रमात हाती घेतला. लातूर येथे झालेल्या विभागीय स्तरावरील नमो महारोजगार मेळाव्यात सुमारे 4 हजार 348 हून अधिक उमेदवारांना नोक-यांची ऑफर मिळाली आहे. ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेकांना लाभ मिळाला आहे. रोजगार निर्मितीचा लातूर पॅटर्न राज्यात निर्माण करण्याचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-यांना मानस आहे.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महसूल वसुलीला प्राधन्य दिले. त्यांनी आखलेल्या नियोजनातून महसूल वसुलीचे 106 टक्के उदिष्ट साध्य झाले आहे. 70 कोटी 99 लाख रुपयांची महसूल वसुली शासनास जमा करण्यात आली आहे. तसेच महसूल सप्ताहादरम्यान लातूर जिल्हयात युवा संवाद, मदत एका हाताने, सेवा अधिकारी व कर्मचारी संवाद, महसूल न्यायालय, लोकसंवाद, लष्करी संवाद आदी उपक्रम त्यांनी घेतले. निवडणूक ते नैसर्गिक आपत्ती या प्रत्येक बाबतीत महसूल विभागाची प्रमुख भूमिका आहे. सर्वसामान्य जनतेला योजनांचा लाभ मिळवून देण्यासोबतच त्यांच्या मनातील प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी कार्यालयात समस्या घेऊन येणा-या नागरिकांशी सुसंवाद ठेवून, यांनी तक्रार केवळ कागद म्हणून न वाचता ती तक्रार मानवी दृष्टीकोन ठेवून समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा पुढाकार असतो.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाला त्यांनी गती दिली. जिल्हयातील 103 तलावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यासाठी 12 कोटी रूपये मंजूर करण्यात आले. ज्यामुळे 35 लाख घनमीटर गाळ काढून जिल्हयातील शेतक-यांच्या जमीनी सुपीक होणार आहेत. मागच्यावर्षी लातूर जिल्हयात कमी पाऊस झाल्याने जिल्हयात झालेल्या पाणी टंचाईचा समाना करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलेले सुक्ष्म नियोजन प्रभावी ठरले. त्यांनी उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवला. जलाशयांमधून अवैध उपसा थांबविण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था केली. तसेच पावसाळयापूर्वी मोठया प्रमाणात वृक्षलागवड, जलसंधारणाची कामे, भूजल पुनर्भरण आदीचे नियोजन केले. जंगलातील पुर्नवनीकरण योजनेत 15 हेक्टरवर रोपांची लागवड, पाणी व मातीची धूप रोखण्यासाठी वॉटर हार्वेस्टिंग व कॉन्टूर ट्रेंचिंक आदी उपक्रम हाती घेतले.
महिला सक्षमीकरणासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांचा नेहमीच पुढाकार असतो. त्यांनी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर स्त्री-शक्ती सन्मान शिबिराचे आयोजन करुन जिल्हयातील दहा तालुक्यामध्ये 1 हजार 680 महिलांशी संर्पक साधून त्यांना प्रमाणपत्र व इतर योजनांचा लाभ दिला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेत जिल्हयातील एक पालक, अनाथ, अंपग अशा एकूण 2 हजार 241 मुलांना दरमहा 2250 रुपये अनुदान दिले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हयात कार्यक्रमाचे आयोजन करुन महिला सक्षमीरणावर भर दिला. याशिवाय क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक गुणवत्ता, महिला स्वयंसहाय्यता गटांना प्रशिक्षित करून त्यांना उद्योजक बनविणे, रेशीम उद्योगाला चालना देणे, अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी तसेच विविध योजनेचे लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे, श्रावण बाळ योजनेला प्राधान्य देणे, पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणे, हेरिटेज वॉक उपक्रम, पर्यटन व पारंपरिक वारसा जोपासण्यासाठी पुस्तकाची निर्मिती अशा कितीतरी बाबींवर लातूर जिल्ह्याचे नाव राज्याच्या नकाशावर आणण्याचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा माणस आहे.
खरं तर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घूगे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण करणा-या अधिकारी आहेत. त्या सतत जिल्हाभरात फिरून कामाचा आढावा घेतात. त्यांची काम करण्याची हातोटीच निराळी आहे. जे काम हाती घेतले ते काम वेळेत पूर्ण करून दाखतात. त्यांचा लोकांशी असेलेला संवाद, अधिकारी व कर्मचाऱ्यांची अडचणी समजून त्या सोडवणे व त्यांना मार्गदर्शन हा त्यांचा नित्यांचाच भाग आहे. आपल्या कामातून ठसा उमटवणा-या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांना लाख-लाख शुभेच्छा.
– मिलिंद व्यवहारे, नांदेड
– 8626025825