गावठी पिस्टल बाळगुन तीची विक्री करणाऱ्या तीन गुन्हेगारांना अटक तीन गावठी पिस्टल, 05 जिवंत काडतुस
नांदेड, 08/2024, नांदेड जिल्हयामध्ये गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याचे दृष्टीने मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. किस्तीका एम. एस. सहाय्यक पोलीस अधिक्षक, उप विभाग, नांदेड शहर, मा. श्री. सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा नांदेड यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष देऊन त्यांना नियमीतपणे चेक करण्याच्या सुचना दिल्या.
सदर सुचनांचे अनुषंगाने आज दिनांक 07.06.2024 रोजी परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आर. डी. वटाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, विजयकुमार नंदे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, शेख ईम्रान शेख एजाज, बालाजी कदम, रमेशभाऊ सुर्यवंशी, मेघराज पुरी, भाऊसाहेब राठोड, अंकुश पवार है अभिलेखावरील फरारी व पाहीजे असलेल्या आरोपीतांचा शोध घेणेकामी पोलीस ठाणे हद्दीत रवाना झाले.
आरोपीचा शोध घेत असतांना एका गुप्त बातमीदाराने सपोनि वटाणे साहेब यांच्या पथकाला खात्रीलायक बातमी दिली की, हिंगोली गेटच्या खाली दोन ईसम त्यांच्या ताब्यात दोन गावठी पिस्टल विक्री करण्याचे उद्देशाने बाळगलेले आहेत. वगैरे खात्रीलायक बातमीवरुन नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यानी मिळालेल्या माहीतीच्या ठीकाणी छापा मारुन दोन ईसमांना संशईत हालचालीवरुन पकडले. त्यांना त्यांचे नांवगांव विचारणा करता त्यांनी त्यांची नांवे 01. गोपाल पिता सुदर्शन चव्हाण, वय 19 वर्षे व्यवसाय शिक्षण रा. दत्तनगर, तामसा, ता. हदगाव जि. नांदेड. ह.मु. सिध्दी आर्केड प्लॅट नंबर 301, नमस्कार चौक नांदेड मोबाईल नंबर 7038240557, 02. शुभम पिता राजुसिंह सुर्यवंशी, वय 24 वर्षे व्यवसाय व्यापार रा. समर्थनगर शोभानगर जवळ नांदेड मोबाईल क्रमांक 9226718312 अशी सांगितले. त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात दोन गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुस मिळुन आले. त्यांना विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी त्यांचा अजुन एक मित्र असुन त्यांचेकडे सुध्दा गावठी पिस्टल असल्याची माहीती दिली. सदर माहीतीवरुन आरोपी मनोज पिता मोहन मोरे, वय 20 वर्षे व्यवसाय शिक्षण रा. कारेगाव ता.लोहा जि. नांदेड मोबाईल क्रमांक 9552391455 यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांचेकडे एक गावठी पिस्टल व तीन जिवंत काढतुन आढळुन आलेले आहेत.
सदर आरोपीतांकडे अधिक विचारणा केली असता त्यांना सदरचे गावठी पिस्टल व काडतुस अभिलेखावरील गुन्हेगार नामे रणवीरसिंघ उर्फ शेरा उर्फ टायगर रा. देवनगर तांडा ता. घनसांगवी जि. जालना यांनी विक्री करण्यासाठी दिले असल्याचे सांगितले आहे. वरुन पोहेको/2085 विजयकुमान नदे यांचे फिर्यादी वरुन पो.स्टे. वजिराबाद गरुन 261/2024 कलम 3/25,7/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोद करुन सपोनी आर.डी. वटाणे, सदर गुन्हयाचा तपास करीत आहेत. सदर गुन्हयात सायबर सेल नांदेड येथील पोहेको/1242 राजेंद्र सिटीकर व पाहेको/1296 दिपक ओढणे यांची तांत्रीक मदत मिळली आहे.
पोलीस ठाणे वजीराबाद येथील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तीन आरोपीतांकडुन तीन गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुस असा एकुण 1,22,500/- रुपयाचा ऐवज जप्त केल्यामुळे वरीष्ठांनी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.