महाराष्ट्रा
‘त्या’ 100 जणांसाठी धोकाच! आदित्य ठाकरेंचं भाकीत खरं ठरणार?
मुंबई, 6 जानेवारी : ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला, तसेच आज नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खोके आणि धोक्यासाठी काही लोक तिकडे गेले, मात्र जे निष्ठावंत आहेत ते अजूनही आमच्याच सोबत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिंदे, फडणवीस सरकारला टोला दरम्यान यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे, फडणवीस सरकारला जोरदार टोला लगावला आहे. राज्यातील राजकीय पातळी घसरली आहे. राज्यात कुठलीही नवीन गुंतवणूक नाही.
राज्याला सध्या पुढे नेण्याची गरज आहे. मात्र राज्यात एक सीएम तर दुसरा स्पेशल सीएम त्यामुळे गुंतवणूक होत नाही. हे सरकार लवकरच पडेल असा टोला आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर देखील आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल योगीजी , शिवराजजी आले. इतर राज्यांचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येतात. मात्र आपले मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन स्वत:चे काम करून येतात असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.