छायाचित्रकार विजय होकर्णे यांचा ८ रोजी कार्यगौरव सोहळा
श्री केदार जगद्गुरू व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती
नांदेड, आपल्या छायाचित्रणाच्या माध्यमातून नांदेडची सांस्कृतिक श्रीमंती जतन करतानाच जिल्ह्यातील राजकारण, समाजकारण, नांदेडचे पुरातन जतन व ऐतिहासिक महत्त्व यांसह वन्यजीव आणि पर्यावरण यासारख्या अनेक विषय आणि भावभावनांचे उत्कृष्ट क्षण छायाचित्रणातून स्मृतीबद्ध करणारे विजय होकर्णे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असून त्यांचा कार्यगौरव सोहळा दि.८ रोजी श्री केदार जगद्गुरू यांच्या दिव्य सान्निध्यात व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती होकर्णे कार्यगौरव सोहळ्याचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी दिली.
दि.८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ज्योती टॉकीज जवळील हॉटेल मिडलॅन्डमध्ये आयोजित केलेल्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर हे भूषविणार असून यावेळी माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन विजय होकर्णे कार्यगौरव सोहळ्याचे स्वागताध्यक्ष तथा माजी मंत्री डी. पी. सावंत, कार्याध्यक्ष माजी सभापती किशोर स्वामी, ज्येष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी, दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, उद्योजक प्रदीप चाडावार, महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हुरणे यांनी केले आहे