जिला

महिलांनी मतदानासाठी पुढे यावे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल

 

 

नांदेड,दि. 3- महिला या समाजातील प्रमुख घटक असून लोकशाही बळकटीकरणासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मतदान जनजागृतीच्या नोडल अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत वडेपूरी येथे आयोजित सह्याद्री आदर्श प्रभाग संघाच्या वतीने मतदार शपथ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी गट विकास अधिकारी आडेराघो, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार, गट शिक्षणाधिकारी एन.एम. वाघमारे, श्रीमती अंबलवाड यांची उपस्थिती होती.

पुढे त्या म्हणाल्या, मागच्यावेळी नांदेड लोकसभा मतदार संघासाठी 65 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असून महिलांनीही यात पुढाकार घेवून शंभर टक्के मतदार करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.

आज जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये उमेद स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी गावात मतदाना विषयी जनजागृती करुन मतदानाची शपथ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज सुमारे दोन लाख पेक्षा अधिक महिलांनी प्रत्येक गावात शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेतली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button