राजकारण

केतकी चितेळ्याच्या पोस्टवरून सुषमा अंधारेंचा सवाल “देवेंद्र भाऊ हा देवी देवतांचा सन्मान आहे का?”

मुंबई : मागील दोन दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण विविध मुद्यांवरून चांगलचं गाजत आहेत. यातच अभिनेत्री केतकी चितळे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे. त्यावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देवही दारू पितात. काली मातेला तर दारुचे नैवेद्द असते. तसेच काही शंकाराच्या मंदिरातही दारू असते. असं म्हणत केतकी चितळे यांनी पोस्ट केली आहे. त्यावरून सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

देवेंद्र भाऊ हा देवी देवतांचा सन्मान आहे का? की फक्त तुमच्या विरोधी पक्षातले लोक बोलतात. त्याचाच गहजब करावा. त्यावरच घसा ताणून सभागृहामध्ये आक्रस्ताळेपणा करावा असं काही तुमचं ठरलं आहे. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे.

देवेंद्र भाऊ हा देवी देवतांचा सन्मान आहे का ?
की फक्त तुमच्या विरोधी पक्षातले लोक बोलतात त्याचाच गहजब करावा त्यावरच घसा ताणून सभागृहामध्ये आक्रस्ताळेपणा करावा असं काही तुमचं ठरलं आहे ?

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button