राजकारण

‘नाहीतर तुमचं मंत्रिपद काढून घेईन’ पंतप्रधान मोदींनी राणेंना झापलं, शिवसेनेच्या खासदाराचा गौप्यस्फोट

णकवली, 03 जानेवारी : ‘नारायण राणेंकडे असलेल्या पीएने या मंत्रालयाच्या माध्यमातून अनेकांना गंडे घातले. पंतप्रधान मोदींना हे जेव्हा कळले तेव्हा त्यांनी राणेंना समज दिली.
त्या पीएला आधी हाकला नाहीतर तुमचं मंत्रिपद काढून घेणार, असा इशारा दिला असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. कणकवली इथं नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हजर होते. यावेळी राऊत यांनी दिल्लीतील गोष्टीचा मोठा खुलासा केला.

मागच्या अधिवेशनामध्ये केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर दिले होते. या प्रकारानंतर राणे लोकसभेची पायरी चढायचेच विसरले. राणे अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासालाही उपस्थित राहत नाहीत, अशी खरमरीत टीका शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेवंर केली आहे. ‘मध्यल्या काळात त्यांनी एक पीए ठेवला होता.

या पीएची काम ही फक्त पटवापटवीची होती. अनेकांना त्याने गंडा घातला. मोदी साहेबांच्या हे लक्षात आलं. त्यावेळी, या पीएला आधी हाकलून द्या, नाहीतर मंत्रिपद काढून घेईन, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंना झापलं होतं, असा खुलासा विनायक राऊत यांनी केला.

लोकसभेत सर्व मंत्री हजर होते. वेगवेगळ्या मुद्यावर सर्वजण बोलत होते. आता या महाशयांना धड बोलता येत नाही. मालवणीही नीट बोलता येत नाही.

मराठीचा तर पत्ता नाही. फडणवीस या शब्दाचा उच्चार तर करताही येत नाही. दक्षिणेतील एका खासदारने केरळमध्ये कोरोनाच्या काळात लघु उद्योग खात्यातून काय रोजगार देणार, काय उपाययोजना करणार असा प्रश्न विचारला, त्यावर राणे उभे राहिले, आम्हाला वाटलं चांगलं उत्तर देतील, पण प्रश्न होता केरळचा आणि उत्तर दिलं तामिळनाडूचं, तेव्हापासून हे महाशय सभागृहात येत नाही. अधिवेशनाच्या काळात सुद्धा उभे राहिले नाही. MSEM चा फुलफॉर्म काय आहे, हे एकदा तरी सांगा, अशी खिल्लीही राऊत यांनी उडवली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button