हेल्थ

भारतीय आयुर्विमा महामंडळ च्या गोल्डन जुबली फाउंडेशन तर्फे स्कूल बस आणि नेत्र तपासणी व्हॅन चे लोकार्पण.

नांदेड, भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे गोल्डन जुबली फाउंडेशन चालविले जाते. या अंतर्गत सामाजिक कार्य आणि  विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. त्याचाच एक भाग म्हणून 26 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे झोनल मॅनेजर श्री कमल कुमार सर यांच्या हस्ते नांदेड येथील श्री दशमेश ज्योत इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजला स्कूल बस देण्यात आली आणि त्याचा लोकार्पण सोहळा श्री कमल कुमार सर झोनल मॅनेजर, पश्चिम क्षेत्र, एलआयसी यांच्या हस्ते पार पडला. 
एलआयसी ही भारतातील नंबर एक ची विमा कंपनी असून ती सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते, भारतभर आपले सामाजिक कार्य करत असते व यापुढेही सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहील अशी ग्वाही श्री कमल कुमार सर यांनी याप्रसंगी बोलताना दिली. 
याप्रसंगी भारतीय आयुर्विमा महामंडळ नांदेड विभागाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक श्री रमेश भट सर, श्री. के आनंद, मार्केटिंग मॅनेजर. श्री हिरडे सर( मॅनेजर सेल्स),  श्री पांडुरंग भातलवंडे (डेप्युटी मॅनेजर BAC), श्री  नंदनकर ( डेप्युटी मॅनेजर BAC),  श्री मिलिंद कांबळे ( डेप्युटी मॅनेजरCLIA), श्री पोपुलवार सर (चीफ मॅनेजर नांदेड-१ शाखा), श्री फळके,  तसेच नांदेड  शाखेतील विकास अधिकारी, कर्मचारी, विमा प्रतिनिधी  आणि शाळेचे प्राचार्य श्री. सरदार मानसिंग, श्री. क्लेमट आलेडा (डिन), श्री. इरफान लुलानिया (कोऑर्डिनेटर) विद्यार्थी, सर्व शिक्षक वृंद  व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.  दशमेश ज्योत स्कूलचे संस्थापक श्री संत बाबा ज्योतिंदर सिंघजी, मित जत्थेदार गुरुद्वारा नांदेड. यांनी याप्रसंगी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे आभार मानले.
त्याचबरोबर गोल्डन जुबली फाउंडेशन तर्फे नेत्र तपासणी व्हॅन, लायन्स क्लब नांदेड यांना पण देण्यात आली. त्याचा लोकार्पण सोहळा नंदिग्राम लॉयन्स क्लब नेत्र हॉस्पिटल सिडको नांदेड येथे श्री कमल कुमार सर झोनल मॅनेजर भारतीय आयुर्विमा महामंडळ पश्चिम विभाग यांच्या हस्ते आणि डॉ. महेशकुमार डोईफोडे सर आयुक्त नांदेड महानगरपालिका यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
डोळा हे शरीराचे अतिशय महत्त्वपूर्ण अंग आहे, त्याचे आरोग्य आपण सर्वांनी राखले पाहिजे आणि देशातील सर्व गोरगरिबांना डोळ्या संदर्भात चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत असे मत श्री कमल कुमार सर यांनी याप्रसंगी व्यक्त केले. तर नांदेड मनपा आयुक्त श्री डोईफोडे सर यांनी एलआयसीच्या या कार्याचे कौतुक केले. 
नेत्र तपासणी व्हॅन ही खेड्यापाड्यात गावागावात जाऊन सर्व गोरगरिबांच्या डोळ्याची तपासणी करण्याची सुविधा लोकांना उपलब्ध करून देईल असे नंदिग्राम लायन्स क्लब चे चेअरमन श्री ज्ञानेश्वर महाजन यांनी सांगितले.
या सोहळा प्रसंगी भारतीय आयुर्विमा महामंडळ नांदेड विभागाचे श्री रमेश भट सर (व. मंडल अधिकारी), श्री के.आनंद (मार्केटिंग मॅनेजर), श्री हिरडे, श्री भातलवंडे,श्री नंदनकर, श्री कांबळे आदी सह सिडको शाखेचे मॅनेजर श्री चनाखेकर सर, श्री के आनंद,  श्री थेटे सर (विकास अधिकारी) इतर विकास अधिकारी कर्मचारी अभिकर्ता उपस्थित होते. नंदिग्राम लायन्स क्लबचे माझी चेअरमन श्री नित्यानंद मैया, श्री जयेश ठक्कर, श्री दिलीप मोदी आणि इतर सर्व पदाधिकारी रुग्णालयातील डॉक्टर्स व स्टाफ याप्रसंगी हजर होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button