49 वा जिल्हास्तरीय स्काऊट गाईड तसेच कब,बुलबुल जिल्हा मेळाव्याचे तालूका नायगाव येथे आयोजन
नांदेड दि. 17 / नांदेड भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय नांदेड व जिल्हा परिषद शिक्षण विभाग, नांदेड यांच्या वतीने जिल्हास्तरीय 49 वा जिल्हा मेळावा दि. 03 ते 06 फेबुवारी 20२4 या कालावधीत माध्यमिक आश्रम शाळा,कुंटुर तांडा ता. नायगाव जि. नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे. स्काऊटस आणि गाईडस ही निधर्मी, अराजकीय व गणवेषधारी सर्वात मोठी चळवळ आहे. ही चळवळ सन 1907 मध्ये इंग्लडमध्ये सुरु झाली असून आजमितीस जगातील 210 देशात सुरु आहे. या चळवळीच्या माध्यमातुन देशाचा भावी नागरीक सुजाण, सुसंस्कत, स्वावलंबी व आत्मनिर्भर घडावा यासाठी ही चळवळ सातत्याने कार्य करीत आहे. या चळवळीत जगातील चार कोटी पेक्षा जास्त युवक-युवती सहभागी असून भारतातील 55 लक्ष तर महाराष्टª राज्यात 15 लक्ष सदस्यांचा त्यात समावेश आहे. तसेच नांदेड जिल्हयातील 32 हजार सदस्य आहेत. या चळवळीची मुलतत्वे लक्षात घेता महाराष्टª शासनाने सन 1972 मध्ये या चळवळीतील अभ्यासक्रमाचा शालेय विषयांतर्गत समावेश केला.
दिनांक 03 ते 06, फ्रेबवारी 2024 या कालावधीत कुंटुर तांडा ता.नायगाव जि. नांदेड येथे 49 स्काऊट गाईड जिल्हा मेळावा आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात नांदेड जिल्हयातील 2000 हजार विध्यार्थी सहभागी होत आहेत. यात प्रामुख्याने नायगाव तालुक्यातील 1000 विध्यार्थी सहभागी होत असून त्यात नांदेड जिल्हयातील 1000 विध्यार्थ्यांचा सहभाग आहे. सहभागी विध्यार्थ्यांसाठी आयोजकांद्धारे निवास व त्या अनुषंगाने लागणा-या भौतिक सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत. या जांबोरीत साहसी व आनंदमयी खेळ, राज्यांतील खादय संस्कती, सांस्कतिक देवाणघेवाण, आजादी का अमत महोत्सव, विचारांची देवाणघेवाण, समुदाय विकास उपक्रम, संचलन व शिस्त, कॅम्प क्राप्ट, कॅम्प फायर, पायोनियरिंग प्रकल्प, शारीरीक कसरती, लोकनत्य, बॅन्ड पथक, इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत.
तसेच जिल्हा मेळावा नियोजन सभा मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्या उपस्थित संपन्न झाली असुन त्यांनी जास्तित जास्त विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवीण्याकरीता आवाहान केले आहे.