जिला

माळेगाव यात्रा कार्यक्रम पोस्टरचे विमोचन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते करण्यात आले

नांदेड,5-  दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेची सुरुवात दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी देवस्वारी, पालखी मिरवणूकीने  होणार आहे. यावेळी विविध स्टॉलचे उद्घाटन करण्यात येईल.  ही यात्रा  चार दिवस भरवली जाणार आहे. यात्रेत जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे स्टॉल, कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन, बचतगटाचे वस्तू प्रदर्शन व इतर सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषदतर्फे आयोजित करण्यात आले आहेत. 

     यानिमित्त आज गुरुवार दिनांक 4 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये माळेगाव यात्रा कार्यक्रम पोस्टरचे विमोचन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी  मंजुषा जाधव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने काढण्‍यात आलेल्‍या पशुसंवर्धन विस्‍तार आणि प्रसिध्‍दी प्रचार पुस्‍तीकाचेही विमोचन करण्यात आले

     माळेगाव यात्रेत दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी देवस्‍वारी, पालखी, मिरवणूक व विविध स्टॉलचे उद्घाटन, कृषी प्रदर्शन व दुग्ध स्पर्धा, दिनांक 11 जानेवारी गायवर्ग पशु, अश्व, शेळी, कुक्‍कुट व श्वान प्रदर्शन व  दिनांक 12 जानेवारी रोजी कुस्त्यांची भव्य दंगल, दिनांक 13 जानेवारी रोजी लावणी महोत्सव आणि 14 जानेवारी रोजी कलामहोत्सव व पशुप्रदर्शनातील विजेत्यांना बक्षीस वितरण व यात्रेचा समारोप कार्यक्रम करण्यात येणार आहे. यात्रेपूर्वी कराव्याच्या उपायजोजनात  जिल्हा वार्षिक योजना यात्रेचा विकास अंतर्गत बायपास रोडचे मजबुतीकरण, अंतर्गत रस्ते, अंतर्गत पाईपलाईन दुरुस्ती, पशुप्रदर्शन स्टेज दुरुस्ती व जमीन सपाटीकरण करणे.  तीर्थक्षेत्रांतर्गत सटवाई तलावाचे सुशोभीकरण करणे इत्यादी कामे मंजूर करून यात्रेपूर्वी पूर्ण करून घेण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा परिषद स्वउत्पादनातून विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

       यावर्षी प्रथमच यात्रेमध्ये सीसीटीव्ही कॅमेराव्‍दारे नियंत्रण करण्यात येणार असून यात्रा प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव, पशुपालक व भाविकांना आवाहन करण्यात येते की दिनांक 10 जानेवारी ते 14 जानेवारी 2024 या कालावधीत जिल्हा परिषद व लोहा पंचायत समिती, माळेगाव ग्राम पंचायत मार्फत यात्रेत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम, विविध विभागाचे  स्टॉल, कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन, बचतगटाचे वस्तू प्रदर्शन आणि इतर कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button