जिला

“वाहन चालक धडकले तहसीलवर , हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणी करीता निवेदन

धर्माबाद :- वाहन चालकावर अन्याय करणारा हिट अँड न्ड रन हा काळा कायदा रद्द करण्याचा मागणी करीता आज २ जानेवारी रोजी सार्वजनिक कमर्शिअल वाहन चालक संघटना, सारथी वाहतूक आघाडी असोसिएशन,जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्था, संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयावर मागण्या संदर्भात घोषणा देत मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार मार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.

शासनाने रस्ते अपघात संदर्भात हिट अँड रन हा कठोर कायदा अमलात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे या अंतर्गत रस्ते अपघातात अनावधानाने कूणी दगावल्यास वाहन चालकाला १० वर्षाची शिक्षा व ७ लाखाचा दंड ठोठावण्यात येणार आहे या अन्यायकारक कायद्या विरोधात वाहन चालकांनी राज्यव्यापी बंद पुकारलेला आहे तालुका संघटनेने सुद्धा सदर बंद आंदोलनात सहभागी होत आज आपले सर्व प्रवासी मालवाहतूक खाजगी वाहने बंद ठेवत आंदोलनात सहभागी झाले. हा कायदा अत्यंत कठोर असून जेमतेम मिळकतीवर कुटंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब वाहन चालकांचे व त्यांचा कुटंबाचे जिवनच उध्वस्त करणारा आहे या कायद्याचा फेरविचार करण्यात यावा याकरीता आज तहसीलदार शंकर हांदेश्वर यांच्या मार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.

 

याप्रसंगी सार्वजनिक कमर्शिअल वाहन चालक संघटना, सारथी वाहतूक आघाडी असोसिएशन,जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्था, संघर्ष वाहन चालक मालक संघटना तसेच मोठ्या संख्येत वाहन चालक हजर होते” चार तारखेला रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. धर्माबादेत वाहन चालक संघटनेचा न्याय मागणी करीता पूकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला जिल्हा शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस, सह अनेक सामाजिक संघटनांने पूर्ण पाठींबा दिला असून वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरत आंदोलनात सहभागी होणार अशी माहिती शिवसेना ( उबाठा) उपजिल्हा प्रमुख गणेश गिरी यांनी दिली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button