टोलमुळे शासनाला महसुलाची ‘समृद्धी’! महामार्गावर ४२२ कोटी ९ लाख रुपये वसूल
वाशिम : समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर या महामार्गावरून डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ५४ लक्ष ५४ हजार ८६२ वाहने धावली. या वाहनांकडून ४२२ कोटी ९ लक्ष ७९ हजार ३९९ रुपयांचा टोल महसूल जमा झाला आहे.
समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर नागपूर ते मुंबई, शिर्डी, नाशिक व इतर शहरांमधील अंतर कमी झाले. हळू हळू या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली. मात्र वाढत्या अपघातांमुळे रस्त्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. ३० नोव्हेंबरपर्यंत या मार्गावर विविध गंभीर प्रकारचे ७३ अपघात होऊन या अपघातात १४२ जणांना आपले प्राण गमावले लागले. तर ४ डिसेंबर २०२३ पर्यंत १ हजार ४८९ अपघात झाले. या महामार्गावरून डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ५४ लक्ष ५४ हजार ८६२ वाहने धावली आहेत. या वाहनांकडून ४२२ कोटी ९ लक्ष ७९ हजार ३९९ रुपये टोल महसूल वसूल झाल्याची माहिती सुरोसे यांनी दिली.
समृद्धी महामार्गावर विहित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, लेन शिस्त न पाळणे, दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करणे, वाहन अवैध ठिकाणी पार्किंग करणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, वाहन सुरक्षित न ठेवणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, सीट बेल्ट न वापरणे आणि वाहन चालक सतर्क नसणे ही प्रमुख कारणे समृद्धी महामार्गावरील अपघातास कारणीभूत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.