पद्मशाली समाजाच्या राज्यस्तरीय उपवधू वर परिचय मेळाव्यास मोठा प्रतिसाद
नांदेड – अखिल भारत पद्मशाली संघम संलग्न मराठवाडा पद्मशाली महासभा अंतर्गत मराठवाडा पद्मशाली महिला संघटना व नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मशाली समाजाचा राज्यस्तरीय उपवधु-वर परिचय मेळावा रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता कै.भूदेवी किशनशेठ गोरंट्याल सभागृह, अग्रसेन भवन मंगल कार्यालय, नावघाट रोड, दुधडेअरी धनेगाव नांदेड येथे संपन्न होणारआहे.
या परिचय मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.श्री.अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते होणार असून मेळाव्याचे अध्यक्षस्थान अखिल भारत पद्मशाली संघमचे गौरव अध्यक्ष मा.श्री.श्रीधरजी सुंकरवार हे भूषविणार आहेत. विशेष अतिथी म्हणून जालनाचे लोकप्रिय आमदार कैलाससेठ गोरंट्याल, व अखिल भारत पद्मशाली संघमचे अध्यक्ष मा.श्री.कंदगटला स्वामी हे असून प्रमुख अतिथी म्हणून आमदार मा.श्री. अमरनाथ राजुरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत,मा.आ.मोहनआण्णा हंबर्डे, माजी आमदार वसंतराव चव्हाण,अखिल भारत पद्मशाली संघमचे उपाध्यक्ष प्रल्हादराव सुरकुटवार,महासभा अध्यक्ष डॉ.मारोतराव क्यातमवार, लेबर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोने, मराठवाडा पद्मशाली युवक संघटना अध्यक्ष गोविंदसेठ कोकुलवार,
उद्योगपती विजय भंडारे, तुलसीदासजी भुसेवार, माधव अण्णा साठे, बालासाहेब मादसवाड, पुण्याचे प्रसिद्ध पेशवाईचे राहुलजी येमुल, उद्योगपती रामचंद्र आडेपवार, वसमत माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार, उपनगराध्यक्ष सिताराम म्यानेवार, प्रकाशभाऊ मारावार, डॉ.विजय बंडेवार, श्रीनिवास धावरशेट्टी, नांदेड जिल्हा परिषदचे मुख्य लेखा वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, मार्कंडेय बँकेचे अध्यक्ष अशोक श्रीमनवार, व्यंकटेशजी जिंदम, सुभाष बल्लेवार, नगरसेवक नागनाथ गड्डम,राजेश यन्नम, शास्त्री सेठ अडकटलवार, नंदुसेठ अडकटलवार मंजुवाले यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याच परिचय मेळाव्यात राज्यभरातून नोंदणी प्रमुखांनी घरोघरी जाऊन उपवधू वरांच्या नोंदणी संकलित केलेल्या जवळपास १००० पेक्षा जास्त नोंदणी असलेल्या सुंदर देखण्या आणि वैशिष्ट्यपूर्ण जाहिरातींनी युक्त अशा सुंदर स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. वधु वर परिचय मेळाव्यासाठी लागणाऱ्या अर्थसाहाय्यचा जगन्नाथाचा रथ अनेक दानशूर समाज बांधवांनी आर्थिक योगदान
देणगी स्वरूपात जाहिरात देऊन मोठा हातभार लावलाआहे.
मेळाव्याचे आयोजक व पदाधिकारी गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रासह, तेलंगाना, आंध्रप्रदेश व इतर अनेक ठिकाणी जाऊन उप-वधुरांची नोंदणीसाठी जनजागृती केले असून त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या कार्यात अखिल भारत पद्मशाली संघम, मराठवाडा पद्मशाली महासभा अंतर्गत सर्व विभागीय संघटना,सर्व जिल्हा संघटना,सर्व तालुका संघटना,गाव व शहर पातळीवरचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. याच परिचय मेळाव्यात एका समाज बांधवांचा विवाह सोहळा सुध्दा संपन्न होणार आहे. सामाजिक गरज आणि सामाजिक बांधीलकी लक्षात घेता येत्या मे महिन्यात अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर मोठ्या प्रमाणात विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचे तयारीही सुरू झाली आहे.
या विवाह सोहळ्यात १०१ जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न करण्याचा मानस आयोजकांनी व वरिष्ठ पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे.पद्मशाली समाजाचा एक उत्सव सण समजून आपली व्यापारी प्रतिष्ठाणे व इतर संस्था बंद ठेवून सहकुटुंब सहपरिवार या मेळाव्यास उपस्थित राहून हा सामाजिक सोहळा यशस्वी करावा असे आवाहन मराठवाडा पद्मशाली महिला संघटनेच्या आयोजक सौ कविताताई गड्डम, सौ.कलावती चातरवार व नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष संग्राम निलपत्रेवार महासभेचे प्रसिद्धीप्रमुख शिवाजी अन्नमवार,
प्रसिद्ध साहित्यिक शंकरराव कुंटूरकर, व्यंकटेश अमृतवार, बजरंग नागलवार, सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पुलकंठवार यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.